Simple Steps to Check If You’re Blocked on WhatsApp esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Tips : व्हॉट्सॲपवर ब्लॉक झाल्याची शंका आहे? फक्त नो डीपी नाही तर 'या' 4 हिंट्स मधून कळेल तुमचा नंबर ब्लॉक आहे की अनब्लॉक

Whatsapp Block : व्हॉट्सॲपवर कोणी तुम्हाला ब्लॉक केलंय याची शंका असल्यास काय करायचं याच्या सोप्या ट्रिक्स

Saisimran Ghashi

Whatsapp : व्हॉट्सॲपवर कोणी तुम्हाला ब्लॉक केलंय का? याची शंका असल्यास काय करायचं? टेन्शन घेऊ नका तुमच्या मनातली शंका दूर करण्यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत. याच्या मदतीने तुम्हाला सहज समजू शकते की, कोणी तुम्हाला ब्लॉक केलं आहे की नाही.

प्रोफाइल आणि स्टेटस

ज्या व्यक्तीशी कॉनटॅक्ट करायचा प्रयत्न करत आहात त्याचे प्रोफाइल पिक्चर आणि स्टेटस दिसत नाहीत तर ही चिन्ह असू शकते की तुम्हाला ब्लॉक करण्यात आलं आहे.

ब्लू टिक मिळत नाही

पाठवलेल्या मेसेजवर फक्त दोन ब्लॅंक टिक दिसत आहेत. तर हे देखील ब्लॉक असण्याची शंका निर्माण करते. कारण पाठवलेला मेसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोच जर झाला असेल तर दोन ब्लू टिक दिसायला हवेत.

लास्ट सीन गायब

समोरच्या व्यक्तीचा लास्ट सीन दिसत नाही. ही गोष्ट ब्लॉकची शंका वाढवते. पण लक्षात ठेवा, कधी कधी लोकं स्वतःच लास्ट लपवून ठेवतात.

ग्रुपमध्ये जोडता येत नाही

सर्वात महत्वाची हिंट म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेली एखादी व्यक्ती ग्रुपमध्ये जोडता येत नाही तर शंभर टक्के त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे.

कॉल कनेक्ट होत नाही

ज्या व्यक्तीशी संवाद साधू इच्छित आहात त्याला व्हॉट्सॲप कॉल करता येत नाही. तर ही ब्लॉकची सर्वात सोपी खूण आहे. कारण ब्लॉक केलेल्या व्यक्तीला कॉल कनेक्ट होणार नाही.

वर दिलेल्या गोष्टींचा समावेश असेल तर तुम्हाला ब्लॉक केले गेले यात काहीच शंका नाही. विशेष म्हणजे तुम्ही ग्रुपमध्ये अॅड करायची कल्पना वापरुन बघा. त्यातून तुम्हाला काही क्षणातच कळेल की तुमचा नंबर ब्लॉक आहे की अनब्लॉक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result पेपरफुटीनंतर गुणांचा महाघोटाळा, अन्सर की अन् स्कोअरकार्डवर वेगवेगळे गुण; बीडच्या 2 विद्यार्थ्यांचा आक्षेप

Bank Holiday: 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी बँका राहणार बंद; बँकेत जाण्याआधी पाहा RBIची यादी

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईत CJP चे आंदोलन, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Tukaram Mundhe यांच्या धाडीनंतर अकोल्यातील गुटखा कारवाईत मोठा ट्विस्ट, काय घडलं?

Corona Virus: कोरोना परत येतोय? महाराष्ट्रात ४८ जणांना लागण; धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT