how to fix low smartphone storage issue in easy way check these options  
विज्ञान-तंत्र

स्मार्टफोनचे स्टोरेज संपलंय? या सोप्या पद्धतीने वाढवा फोनमधील स्पेस

सकाळ डिजिटल टीम

स्मार्टफोन खरेदी करताना आजकाल अशा फोनकडे ग्राहकांचा कल असतो ज्यामध्ये जास्त रॅम आणि जास्त स्टोरेज दिलेले असते. पण तरीही अनेक वेळा फोनचे स्टोरेज कमी पडते. अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की फोनमधील फोटो आणि व्हिडिओ खूप भरलेले असतात आणि फोनचे स्टोरेज पूर्ण भरलेले असते. पुढे त्यामुळे फोन हँग होऊन तो चालवताना खूप त्रास होतो.

अशा समस्येपासून सुटका मिळावी यासाठी काही प्रभावी मार्ग देखील आहेत, ज्याचा वापर करून तुमची 'स्टोरेज फुल्ल' समस्या सोडवली जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया असे उपाय जे तुमच्या फोनची स्पेस वाढवण्यास मदत करतील.

क्लीनिंग App-

प्ले स्टोअरमध्ये असे अनेक अॅप्स आहेत जे तुमच्या फोनचे स्टोरेज क्लिन करतात. हे अॅप्स तुमच्या फोनची मेमरी फ्री करण्यात मदत करतील. हे अॅप्स फोनमध्ये असलेल्या जंक फाइल्स, डुप्लिकेट फाइल्स आणि अनेक मोठ्या फाइल्स डिलीट करतात. यामुळे फोनचे स्टोरेज कमी होते. यामध्ये फोन क्लीनर , व्हायरस क्लीनर , CCleaner सारख्या अॅप्सचा समावेश आहे .

क्लाउड स्टोरेज (Cloud Storage) -

दुसरा उपाय म्हणजे, अशा अनेक कंपन्या आहेत ज्या त्यांच्या फोन सोबत क्लाउड स्टोरेज देतात. ते वापरले जाऊ शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या फोनवरील फोटो आणि व्हिडिओ जास्त स्पेस व्यापत आहेत, तर तुम्ही तुमचे फोटो येथे सेव्ह करू शकता. त्याच वेळी, फोटो आणि व्हिडिओ आवश्यक नसल्यास, ते डिलिट देखील करता येतील.

टेंपररी फाइल्स-

आपल्या फोनमध्ये अशा अनेक फाइल्स असतात ज्या टेंपररी असतात जर तुम्ही ते डिलीट केले तर तुमच्या फोनची मेमरी वाढते. जर तुमच्या फोनमध्ये कॅशे असेल तर तुम्ही ते डिलीट करता, त्यामुळे फोनचा स्पेस रिकामा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

Sachin Tendulkar: विनोद कांबळी सचिनपेक्षा खरंच भारी होता? भावानेच केला खुलासा; म्हणाला, 'तो असं कधीच...'

Dr. Trupti Agarwal: 'मुलं म्हणजे रिपोर्ट कार्ड नव्हे,' डॉ. त्रुप्ती अगरवाल यांचं नवं शैक्षणिक सूत्र

ST Bus conductor drunk : एसटी बसचा कंडक्टर दारूच्या नशेत धुंद; केबिनजवळ जाताच ड्रायव्हरनं...; पाहा VIDEO

Rain-Maharashtra Latest Live News Update: सीएसडीएसचे संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT