Wifi Speed sakal
विज्ञान-तंत्र

Wifi Speed : कोण चोरतंय तुमच्या वाय-फाय इंटरनेटची स्पीड? 'या' ट्रिकने एका सेकंदात जाणून घ्या

अनेकदा अन्य व्यक्ती तुमचा वाय-फाय वापरत असेल तर त्यामुळेही स्पीड कमी होऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

Wifi Speed : जर तुमच्या वाय-फाय इंटरनेटची स्पीड अचानक कमी होत असेल तर तुम्ही अनेकदा एक्विपमेंट किंवा प्रोवायडरला दोष देता पण तुम्हाला माहिती आहे का यामागे अन्य कारणही असू शकतं. अनेकदा अन्य व्यक्ती तुमचा वाय-फाय वापरत असेल तर त्यामुळेही स्पीड कमी होऊ शकते.

कदाचित तुमचा वाय-फाय तुमच्या आजुबाजूला राहणारे लोक वापरत असतात पण तुम्ही ठामपणे हे जाणून घेऊन शकता की कोण तुमचा वायफाय चोरत आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. ( how to get know who is stealing your wifi internet speed)

जर तुमच्या इंटरनेटची स्पीड अचानक कमी झाली तर वेळोवेळी चेक करा की तुमचं इंटरनेट कोण वापरत आहे. सोबतच तुमच्या वायफायला नेहमी पासवर्ड प्रोटेक्टेड ठेवा.

फक्त तुमचा डिवाइसच याच्याशी कनेक्ट असायला हवा. जर तुम्हाला तुमच्या घरच्या वायफायला कनेक्ट झालेले सर्व डिवाइस बघायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला राउटर अॅपला लोड करावे लागतील. पहिल्यांदा आपला वायफाय सेट करताना वेळ मेन्शन केलेली दिसेल की केव्हा तुम्ही शेवटच्या वेळी पासवर्ड बदलला होता.

यासाठी आपल्याला लॉगिन क्रेडेंशियल्सची गरज भासणार जी साधारणत: राउटरवरच असते. राउटरच्या खाली एक वेब अड्रेसही असणार जो आपल्याला डिवाइसशी कनेक्ट करण्याची सुविधा पुरविणार. जर तुमच्या राउटरमध्ये अॅप नसेल तर तुम्हाला ब्राउजरद्वारे तुम्ही जाणून घेऊन शकता.

यासाठी सुरवातीला लॉग इन करा. कनेक्टेड डिवाइस किंवा वायरलेस क्लाइंट मेन्यूमध्ये जा. जर तुमच्या नेटवर्कवर अनेक वाय-फाय गॅजेट असेल तर त्यामधून काही गॅजेटची ओळख पटवणे, कदाचित अशक्य असू शकतं. कारण सर्वांकडे “आयफोन” किंवा “आयपॅड” सारखे सोपे नाव नसेल. ते आपल्या डिवाइसचे नाव बदलू शकता.

यासाठी सर्वात सोपा पर्याय आहे की आपण सर्व डिवाइसला डिस्कनेक्ट करावे. गरज पडली तर आपण फॅमिली मेंबर्सच्या डिवाइसला पुन्हा कनेक्ट करू शकतो आणि सर्व अनवॉन्टेड डिवाइसला डिस्कनेक्ट करू शकतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur News: वादग्रस्त गावांत दुहेरी जनगणना, सीमाभागात गोंधळ; महाराष्ट्रासह तेलंगणकडूनही प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात पोलीस सुरक्षेत पेट्रोल पंपांवर इंधन तेल विक्री

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची कान्सच्या रेड कार्पेटवर हटके एन्ट्री, सोशल मीडियावर Viral Video

Rishabh Pant: रिषभ पंतला उपकर्णधारपदाचा फटका? निवड समिती घेणार मोठा निर्णय

Nagpur News: प्रेमविवाहानंतर १२ वर्षे संसार, पत्नी दुसऱ्यासोबत गेली; पतीनं उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT