how to get low price products on online shopping sites like amazon and flipkart check
how to get low price products on online shopping sites like amazon and flipkart check  sakal
विज्ञान-तंत्र

Flipkart, Amazon वर स्वस्तात खरेदी करायचीय? वापरा 'या' सोप्या टिप्स

सकाळ डिजिटल टीम

Online Shopping Tips : Flipkart आणि Amazon सारख्या वेबसाइट्सवर खरेदी करताना तुम्हाला स्वस्तात वस्तू हव्या असतील तर आज आपण काही ट्रिक्स जाणून घेणार आहोत. ज्या वापरुन तुम्ही परवडणाऱ्या किमतीत चांगले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता आणि यासाठी तुम्हाला सेलची वाटही बघावी लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया सोप्या टिप्स , ज्या वापरुन तुम्हाला या वेबसाइट्सवर परवडणाऱ्या किमतीत मनसोक्त खरेदी करता येईल.

वीकेंडला शॉपिंग करू नका

बहुतेक लोकांना असे वाटते की वीकेंडला खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल, तर तसे अजिबात नाही कारण ऑनलाइन शॉपिंग साइट्समध्ये वीकेंडला सर्वाधिक जास्त वापरल्या जातात, त्यामुळे ऑफर आणि सूट तर सोडाच तुम्हाला मुळ किंमतीत देखील वस्तू मिळणार नाहीत. कारण अशा वेळी बहुतेक प्रॉडक्ट हे आऊट ऑफ स्टॉक असतात. ज्या दिवशी अजिबात गर्दी नसते, जसे की सोमवार ते गुरुवार अशा दिवशी खरेदी करण्याचा प्रयत्न करा, कारण कामाच्या दिवसात लोकांकडे वेळ नसतो आणि तुम्हाला चांगली सूट मिळण्याची शक्यता देखील वाढते.

कार्टमध्ये वस्तू गोळा करुन ठेवू नका

अनेक वेळा वेळेच्या कमतरतेमुळे तुम्ही तुमचे आवडते प्रॉडक्ट ऑनलाइन शॉपिंग साईटच्या कार्डमध्ये सेव्ह करून ठेवता आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही ते नंतर खरेदी करू पण जोपर्यंत तुम्ही ते विकत घेण्याचा विचार करता तेव्हा त्याची किंमत खूप वाढलेली असते. असे का घडते आणि त्यामागील कारण काय आहे हे माहित नाही परंतु बर्याच वापरकर्त्यांसोबत असे घडले आहे, त्यामुळे प्रॉडक्टचे जाणून घ्या आणि कार्टमध्ये सेव्ह न करता डायरेक्ट विकत घ्या.

डेबिट कार्ड वापरणे टाळा

जर तुम्ही अॅडमिट कार्डने खरेदी करत असाल तर तुम्ही ते वापरणे टाळावे कारण डेबिट कार्डवर खूप कमी ऑफर्स दिल्या जातात, तर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला त्यावर अनेक ऑफर्स मिळतील. तसेच तुम्ही अतिरिक्त बोनस मिळवू शकता. .

कॉईन्स आणि पॉइंट्स वापरा

तुम्ही खरेदी करता तेव्हा तुम्हाला कॉईन्स किंवा पॉइंट्स दिले जातात आणि जर तुम्ही ही कॉईन्स आणि पॉइंट्स खरेदी करताना वापरत असाल तर तुम्हाला खरेदी करताना कमी किंमत मोजावी लागेल, त्यामुळे त्यांचा वापर करायला विसरू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT