Instagram Reels eSakal
विज्ञान-तंत्र

Instagram Reels : इन्स्टाग्राम रील्स व्हायरल जात नाहीत? फॉलो करा या सोप्या टिप्स; जाणून घ्या अपलोड करण्याची योग्य वेळ

Reels Tips : इन्स्टाग्रामवर रील्स बनवताना तुम्ही ट्रेडिंग विषयांनी सुरुवात करू शकता. एखादा विषय ट्रेंडमध्ये असताना त्यासंबंधित रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

Sudesh

How to make Instagram reels Viral : आजकाल कित्येक लोक इन्स्टाग्रामचा वापर करतात. इन्स्टाचा शॉर्ट व्हिडिओ फॉरमॅट असणारे रील्स पाहण्यात वेळ कसा निघून जातो हे समजत देखील नाही. रील्स बनवणं सोपं झाल्यामुळे कित्येक लोक या माध्यमातून सोशल मीडिया स्टार्स आणि इन्फ्लुएन्सर झाले आहेत. या माध्यमातून या रीलस्टार्सची चांगली कमाई देखील होत आहे. तुमचेही रील्स अशा प्रकारे व्हायरल जावेत, यासाठी काही गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे.

ट्रेडिंग विषय घ्या

इन्स्टाग्रामवर रील्स बनवताना तुम्ही ट्रेडिंग विषयांनी सुरुवात करू शकता. एखादा विषय ट्रेंडमध्ये असताना त्यासंबंधित रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

ट्रेडिंग ऑडिओ वापरा

तुम्हाला दुसऱ्या विषयावर रील्स बनवायचे असतील, तर त्यासाठी ट्रेंडिंग ऑडिओचा वापर करा. ट्रेडिंग ऑडिओ शोधण्यासाठी तुम्हाला केवळ आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलला भेट द्यायची आहे. यानंतर प्रोफेशनल डॅशबोर्डवर क्लिक करा. यानंतर स्क्रोल डाऊन करत गेल्यास ट्रेंडिंग ऑडिओचा पर्याय दिसेल. याठिकाणी तुम्हाला ट्रेंडिंग ऑडिओची यादी दिसेल. यातील फेमस ऑडिओ तुम्ही वापरू शकाल.

अपलोड करण्याची योग्य वेळ

इन्स्टाग्रामवर रील्स पोस्ट करण्याची योग्य वेळ म्हणजे, तुमचे फॉलोवर्स जेव्हा सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह असतात ती वेळ. यासाठी तुम्हाला आपल्या प्रोफेशनल डॅशबोर्डवर जाऊन Insights हा पर्याय निवडायचा आहे. याठिकाणी तुम्हाला तुमचे अ‍ॅक्टिव्ह यूजर्स दिसतील. यासोबतच, कोणता रील किती जणांनी पाहिला, किती लोकांपर्यंत पोहोचला याची देखील माहिती मिळते. (Right time to upload Instagram Reels)

सर्वसाधारणपणे बोलायचं झाल्यास इन्स्टाग्राम रील्स पोस्ट करण्यासाठी सकाळी 6, सकाळी 9, दुपारी 12, दुपारी 3, सायंकाळी 6 आणि रात्री 9 या योग्य वेळा आहेत. या वेळी लोक इन्स्टाग्रामवर सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह असतात असं रिसर्चमध्ये समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: LPG सिलेंडर 209 रुपयांनी स्वस्त! पेट्रोल, डिझेल आणि CNG चेही नवे दर जाहीर

Maharashtra Loan Waiver: अद्याप २०१७ ची कर्जमाफी प्रलंबित, ६ लाख ६४ हजार शेतकरी ९ वर्षांपासून लाभाच्या प्रतीक्षेत

Corporators Disqualification: महाराष्ट्रात राजकीय खळबळ! 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; भाजपचे 7, एमआयएमचे 16 सदस्य रडारवर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये खड्ड्यामुळे पुन्हा अपघात, तरुण गंभीर; डोक्यावर शस्त्रक्रिया

Beed ACB: सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर घरी गेला अन् ४५ लाखांची लाच घेतली; वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT