Instagram Money eSakal
विज्ञान-तंत्र

Instagram Money : इन्स्टाग्रामवरुन पैसे कमावायचे आहेत? 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो

इन्स्टाग्रामवरून कमाई करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या मार्गांबद्दल सांगणार आहोत.

Sudesh

Instagram Money : आजकाल कितीतरीजण फक्त इन्स्टाग्रामवरुन लाखो रुपये कमवत आहेत, ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळत आहे. आजच्याच दिवशी २०१० ला इन्स्ट्राग्रामला सुरुवात झाली होती. जर तुम्ही इन्स्टाग्रामवरून कमाई करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या मार्गांबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही सहजपणे इन्स्टावरुनही तगडी कमाई करू शकता. सोशल मीडियाचा वापर करून तुम्हीही सहज खिसा भरू शकता.

इन्स्टाग्राम रील्स

इन्स्टाग्राम रीलच्या मदतीने तुम्ही सहज कमाई करू शकता. तुमची एखादी रील व्हायरल झाली तर, ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते. म्हणूनच तुम्हाला आधी रीलबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. अनेक इन्फ्लूएन्सर्स याच्या मदतीने कमाई करत आहेत. तुम्हीही याच्या मदतीने चांगली कमाई करू शकता. तुम्हाला फक्त कंटेटकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

बिझनेस अकाउंट

तुमच्याकडे बिझनेस अकाउंट असले तरीही तुम्ही मोठी कमाई करू शकता. पण या खात्यावर तुम्ही सतत काम केले तरच तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हाला स्वतंत्र जाहिराती देखील मिळू शकतात आणि जाहिरातीच्या मदतीने तुम्ही मोठी कमाई करु शकणार आहात. पण यातून कमाई करण्यासाठी तुमचा कंटेट चांगला असणं गरजेचं आहे.

व्हायरल पोस्ट

तुम्ही सोशल मीडियावरून कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी व्हायरल पोस्ट ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. कारण ज्या युजर्सच्या पोस्ट खूप व्हायरल होतात तेच थेट लोकांकडून कमाई करत आहेत. त्यामुळे तुमच्या पोस्ट व्हायरल झाल्या तरच तुम्ही चांगली कमाई कराल. कंटेट हटके आणि भारी असल्यास पोस्ट नक्कीच व्हायरल होऊ शकते. मग फोटो, व्हिडीओ काही व्हायरल झाले तरी तुम्हाला फायदा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT