Instagram Hidden Emoji Game eSakal
विज्ञान-तंत्र

Instagram Hidden Game : मेसेजच्या रिप्लायची वाट पाहून कंटाळलात? इन्स्टाग्राम अ‍ॅपवरच खेळू शकता खास गेम; जाणून घ्या कसं

Instagram Emoji Game : इन्स्टाग्रामने आपल्या यूजर्ससाठी हे नवीन फीचर लाँच केलं आहे. या मदतीने यूजर्स अ‍ॅपमध्ये पाँग ही गेम खेळू शकणार आहेत.

Sudesh

Instagram Hidden Pong Game : इन्स्टाग्रामचे जगभरात कोट्यवधी यूजर्स आहेत. रील्स पाहण्यासाठी किंवा फोटो पोस्ट करण्यासाठी हे सोशल मीडिया अ‍ॅप प्रसिद्ध आहे. यूजर्स दिवसातून कित्येक वेळ या अ‍ॅपवर स्क्रोल करत असतात. मात्र, याच इन्स्टाग्राम अ‍ॅपमध्ये चक्क एक गेम देखील लपलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

इन्स्टाग्रामने आपल्या यूजर्ससाठी हे नवीन फीचर लाँच केलं आहे. या मदतीने यूजर्स अ‍ॅपमध्ये पाँग ही गेम खेळू शकणार आहेत. ही गेम कुठे लपलेली आहे, आणि ती कशी खेळायची याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

इनबॉक्समध्ये लपली आहे गेम

इन्स्टाग्रामची ही गेम खरंतर डीएम, म्हणजेच डायरेक्ट मेसेजमध्ये लपलेली आहे. ही गेम खेळण्यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीला मेसेजमध्ये केवळ एक इमोजी पाठवावी लागणार आहे. (Instagram DM Game)

मेसेजमध्ये इमोजी पाठवल्यानंतर तुम्हाला या इमोजीवर टॅप करावं लागणार आहे. यानंतर ही गेम सुरू होईल. (Instagram Emoji Game)

यामध्ये तुम्हाला ही ईमोजी खाली पडू द्यायची नाही. यासाठी खाली ब्लॅक कलरचा एक प्लॅटफॉर्म मिळेल. हा प्लॅटफॉर्म तुम्ही टॅप करुन आजूबाजूला स्क्रोल करू शकाल.

या प्लॅटफॉर्मवरुन ही इमोजी बाऊन्स करुन तुम्ही आपला स्कोअर वाढवू शकता. प्रत्येक पाच पॉइंटनंतर इमोजीचा स्पीड वाढणार आहे.

इमोजी खाली पडताच गेम ओव्हर होईल. त्यानंतर तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल.

गुगलवरही मिळते खास गेम

गुगलच्या क्रोम ब्राउजरवर देखील कित्येक वर्षांपासून एक गेम उपलब्ध आहे. इंटरनेट बंद होताच गुगलच्या होम पेजवर एक डायनासोर दिसतो. यानंतर स्पेस बारवर क्लिक करताच हा डायनासोर पळू लागतो. त्याला विविध अडथळ्यांपासून वाचवत पुढे नेणं हे या गेमचं उद्दिष्ट आहे. इंटरनेट पुन्हा सुरू होताच ही गेम मध्येच बंदही पडू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनीषा मुसळे माने यांचा पोलिसांना नवा अर्ज! डॉ. शिरीष यांच्यासह पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. शोनाली यांच्या बॅंक खात्याच्या ऑडिटची मागणी

आजचे राशिभविष्य - 18 जुलै 2025

Panchang 18 July 2025: आजच्या दिवशी दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे

अग्रलेख : तेथे पैजाराचे काम!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 जुलै 2025

SCROLL FOR NEXT