Ads on Mobile Phone Sakal
विज्ञान-तंत्र

Technology Tips : फोनवर सारख्या दिसणाऱ्या जाहिराती बंद कशा करायच्या? जाणून घ्या...

जाहिराती कायमच्या ब्लॉक करता येऊ शकतात.

वैष्णवी कारंजकर

फोन वापरताना काही गोष्टींमुळे खूप त्रास होतो. पहिली गोष्ट म्हणजे फोनमध्ये इंटरनेट नीट येत नसेल तर दुसरं म्हणजे काही कामाच्या मधेच जाहिराती पुन्हा पुन्हा येऊ लागल्यावर. Android फोनवर वारंवार जाहिराती पाहणे खूप त्रासदायक आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे की या जाहिराती कायमच्या ब्लॉक केल्या जाऊ शकतात.

जाहिराती तुमच्या सर्चवर आधारित असतात. तुम्ही काय सर्च करता ते पाहून गुगल त्याच्याशी संबंधित जाहिराती दाखवते. उदाहरणार्थ, जर तुम्ही फोनवर फिटनेस ट्रेनर शोधत असाल, तर काही वेळाने तुम्हाला त्याच्याशी संबंधित किंवा आहाराशी संबंधित जाहिराती दिसू लागतील. पण चांगली गोष्ट अशी आहे की अशी सेटिंग फोनमध्ये देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे फोनवर जाहिराती देखील दिसणार नाहीत.

  1. यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि त्यानंतर गुगलवर क्लिक करावे लागेल.

  2. त्यानंतर तुम्हाला Manage Google Account हा पर्याय निवडावा लागेल.

  3. त्यानंतर तुम्ही त्यावर क्लिक करताच तुम्हाला Data & Privacy चा पर्याय मिळेल.

  4. यानंतर तुम्ही थोडे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला 'पर्सनलाइज्ड अॅड्स' मिळतील. याच्या खाली,तुम्ही काय काय सर्च केलंय, ओपन केलंय हे दिसेल आणि जाहिरातीही दिसतील.

  5. जाहिरातींच्या खाली तुम्हाला 'माय अॅड सेंटर' हा पर्याय दिसेल. तुम्ही त्यावर क्लिक करताच, तुमच्या समोर Personalized Ads चे टॉगल दिसेल, जे तुम्हाला बंद करावे लागेल.

  6. आता Settings वर जा आणि Google वर क्लिक करा. त्यानंतर Delete Advertising ID वर टॅप करा आणि तो हटवण्याची परवानगी द्या. यानंतर तुम्हाला फोनवर कोणत्याही प्रकारची जाहिरात दिसणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT