Simple Steps to Convert Your eSIM to a Normal Physical SIM Card esakal
विज्ञान-तंत्र

SIM Card Port : ई-सिमकार्डला नॉर्मल सिमकार्ड बनवायचं? घरबसल्या फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स

E-Sim Card to Physical Sim Card : eSIM ला परत नॉर्मल सिमकार्ड किंवा फिजिकल SIM मध्ये कसं बदलून घेता येईल हे जाणून घेण्यासाठी सोप्या स्टेप्स फॉलो करा.

Saisimran Ghashi

Sim Card Tips : आजकालच्या अत्याधुनिक स्मार्टफोन्समध्ये eSIM ची सुविधा असते. त्यामुळे वेगळी SIM कार्डची गरज राहत नाही. फोनमध्ये थेटच ही चिप बसवलेली असते. त्यामुळे तुम्ही एका नेटवर्कवरून दुसऱ्यावर सहज स्विच करू शकतात. शिवाय एकाच eSIM मध्ये अनेक प्रोफाईल्स साठवून ठेवता येतात. पण कधी कधी परत फिजिकल SIM ची गरज पडते. मग काय करायचं? चला तर मग जाणून घेऊया eSIM ला परत फिजिकल SIM मध्ये कसं बदलून घेता येईल...

फिजिकल SIM ला उघडण्यासाठी सिम इजेक्टर पिन लागतो. पण eSIM मध्ये एकाच वेळी 3 ते 5 प्रोफाईल्स असू शकतात. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे सिम कार्ड घेऊन फिरण्याची गरज नाही. थेट फोनच्या सेटिंग्जमधूनच दुसऱ्या नेटवर्कवर स्विच करता येतं.

परदेशात फिरणाऱ्यांसाठी तर eSIM खूपच उपयुक्त आहे. कारण त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगळे SIM घेण्याची गरज नाही राहते. तुम्ही स्थानिक ऑपरेटरवर सहज स्विच करू शकतात.

ज्यांना eSIM ऐवजी परत फिजिकल SIM हवी असते त्यांच्यासाठी काय हा प्रश्न नक्कीच पडतो. तर बहुतेक टेलिकॉम कंपन्या ऑनलाईन स्विच करण्याची सोय उपलब्ध करून देतात. पण परत फिजिकल SIM घेण्यासाठी मात्र थोडा त्रास आहे. कारण तुम्ही थेट कंपनीच्या स्टोरवर जाणं गरजेचं आहे.

eSIM ला परत फिजिकल SIM मध्ये कसं राही करायचं?

  • तुमच्या टेलिकॉम कंपनीच्या जवळच्या स्टोरवर जा.

  • तेथील प्रतिनिधींना तुमची सिमकार्डची गरज सांगा.

  • ओळख आणि पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड) सोबत घेऊन जा.

  • ओळखपत्र दाखवल्यानंतर प्रतिनिधी तुमच्या फोनमधून तुमचं eSIM कायमचं निष्क्रिय करतील.

  • त्यानंतर ते तुम्हाला एक नवीन फिजिकल SIM कार्ड देतील.

  • ही फिजिकल SIM तुमच्या त्याच नंबरवर कार्यरत असेल.

  • आता फक्त ही SIM तुमच्या फोनमध्ये घाला आणि झटपट वापर सुरू करा.

  • दोन तासांच्या आत तुमचे फिजिकल SIM सक्रिय होईल.

  • या SIM साठी तुम्हाला कदाचित थोडा शुल्क द्यावा लागेल.

  • तुमची रिचार्ज केलेली रक्कम या नवीन SIM वर ट्रान्सफर होईल. त्यामुळे पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही.

वर दिलेल्या सोप्या टिप्स वापरून तुम्ही सहजपणे eSIM ला परत फिजिकल SIM मध्ये बदलून घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

९-१० तास काम, ओव्हटाइम नाही, दिवसाला ६५० रुपयेच मिळतात; PMPLच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, VIDEO VIRAL

धर्मस्थळ प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेने केला धक्कादायक खुलासा; 'त्या' पुरलेल्या 100 हून अधिक मृतदेहांचे सत्य उलगडणार?

Anil Ambani: अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या! ED नंतर मुंबईत CBIचा छापा; काय आहे 2,000 कोटींच प्रकरण?

ती प्राजक्ता नाहीच! गोविंदा आणि सुनीताच्या चर्चित घटस्फोटामुळे मराठी अभिनेत्रींची का सुरू आहे बदनामी?

Latest Marathi News Updates : नंदुरबार जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT