Clutch and Chain of Bike
Clutch and Chain of Bike Sakal
विज्ञान-तंत्र

उन्हाळ्यात आपल्या वाहनांची काळजी कशी घ्यायची? जाणून घ्या सोप्या टिप्स

सकाळ डिजिटल टीम

दुचाकी वाहनांची अशी घ्या काळजी (Take care of Two-Wheelers like this)-

  • तापलेले इंजिन थंड होण्यासाठी दुचाकी शक्यतो सावलीत उभी करावी.

  • उन्हाळ्यात पेट्रोलची काही प्रमाणात वाफ होते. त्यामुळे टाकी फूल करू नये.

  • इंजिनमध्ये ऑइल लेव्हल मेंटेन करावी. ऑइल कमी झाल्यास इंजिन गरम होऊन त्याचा थेट परिमाण वाहनाच्या कार्यक्षमतेवर होतो.

  • उन्हाळ्यात धूळ जास्त असते. त्यामुळे दुचाकीचा (Bike) एअर फिल्टर नियमितपणे साफ करावा.

  • टायरमधील हवा ठरवून दिलेल्या प्रमाणानुसारच असावी. हवा जास्त असल्यास चाके गरम होतात.

  • लाँग ड्राइव्हला जाताना मधून-मधून वाहनाचा वेग कमी करावा, त्यामुळे तापलेले इंजिन थंड होण्यास मदत होते.

चारचाकी वाहने (Take care of Cars like this)-

  • वाळलेले गवत, पालापाचोळा आदी ठिकाणी मोटार उभी करू नका. सायलेंसरमधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे ते पेट घेऊ शकतात.

  • वाहनांमधील बॅटरीच्या वायरिंगवर वाढत्या तापमानाचा परिणाम होत असतो. त्यामुळे वायरिंग सैल असू नये. त्याच्या कनेक्शची वरचेवर तपासणी हवी.

  • सीएनजी किंवा इलेक्ट्रिकल वाहनांचे सुटे भाग प्रमाणितच असावे.

  • चालत्या वाहनात सीएनजी, डिझेल किंवा पेट्रोलचा वास येत असल्यास मोटार बाजूला घेऊन तपासणी करा. सुरक्षिततेची खात्री झाल्यावरच प्रवास करावा.

  • उच्च दाबाच्या विजेच्या तारांखाली मोटार उभी करू नका. उष्णतेमुळे तारा प्रसरण पावलेल्या असतात. अशा वेळी जोडांच्या ठिकाणी होणाऱ्या स्पार्किंगच्या ठिणग्यांमुळे वाहन पेट घेऊ शकते.

  • ई-वाहन (Electric Vehicle) असल्यास त्यात अग्निशमन उपकरण आवर्जून ठेवा.

''उन्हाळ्यात सगळीकडेच तापमान वाढते. त्याचप्रमाणे दुचाकींचे इंजिनही तापते. ते योग्य पद्धतीने थंड होणे गरजेचे असते. तसेच टायरमधील हवा, एअर फिल्टरची स्वच्छता आदींकडेही लक्ष द्यायला हवे,''असं स्कूटर, मोटारसायकल रिपेअरर्स रिसर्च असोसिएशन, पुणेेचे अध्यक्ष हरीश अनगोळकर यांनी सांगितले.

''वाहने पेट घेण्याच्या घटनांमध्ये उन्हाळ्यात वाढ होते. त्यासाठी काही छोट्या उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास संभाव्य अपघात रोखता येतो. हे लक्षात घेऊन त्यांची अंमलबजावणी वाहनचालकांनी करावी,''ऑटोमोबाईल इंजिनिअर संजय शेडबाळे यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT