How to Disable Annoying Facebook Batch Mentions esakal
विज्ञान-तंत्र

Facebook Notification Problem : कोणीही उठसूट कमेंटमध्ये मेंशन करतंय? एका सेटिंगने बंद करा फेसबुकच्या 'एव्हरीवन' नोटिफिकेशन; वाचा कसं

Facebook Upadte : आपल्या फ्रेंडलिस्ट किंवा ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्वांना एकाच वेळी नोटिफिकेशन मिळावं यासाठी फेसबुकने एक फीचर काही महिन्यांपूर्वी लाँच केलं होतं. पण नोटिफिकेशन्सचं प्रमाण वाढलं की त्या डोकेदुखी वाटू लागतात.

Saisimran Ghashi

Facebook Notification : फेसबुक वापरताना बऱ्याच वेळा आपल्याला 'फॉलोवर्स' किंवा 'एव्हरीवन' अशी नोटिफिकेशन दिसते. आपल्या फ्रेंडलिस्ट किंवा ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्वांना एकाच वेळी नोटिफिकेशन मिळावं यासाठी फेसबुकने एक फीचर काही महिन्यांपूर्वी लाँच केलं होतं.

हे फीचर तसं तर फायद्याचं आहे. मात्र या नोटिफिकेशन्सचं प्रमाण वाढलं की त्या डोकेदुखी वाटू लागतात. कित्येक लोक तर अशा प्रकारे एव्हरीवन आणि फॉलोवर्सना मेन्शन करणाऱ्यांना अनफ्रेंडही करतात. तुम्हीदेखील अशा नोटिफिकेशन्सना वैतागला असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

फेसबुकवर एका सेटिंगद्वारे तुम्ही केवळ अशा प्रकारच्या नोटिफिकेशन्स बंद करू शकता.

हे कसं करता येईल याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या स्मार्टफोनवरच ही सेटिंग तुम्हाला करता येईल. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी आपलं फेसबुक ॲप उघडावं लागेल. यानंतर उजव्या बाजूला कोपऱ्यात असणाऱ्या आपल्या प्रोफाईलच्या आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर स्क्रोल डाऊन करुन सेटिंग्समध्ये जा. याठिकाणी स्क्रोल डाऊन करुन प्रेफरन्सेसमध्ये असणाऱ्या नोटिफिकेशन्स या पर्यायावर टॅप करा.

यानंतर समोर येणाऱ्या पर्यायांमधून टॅग्स या पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये खाली तुम्हाला बॅच मेन्शन्स हा पर्याय दिसेल. या पर्यायासमोरील टॉगल क्लिक करुन तुम्ही तो ऑफ करू शकता. यानंतर तुम्हाला एव्हरीवन किंवा फॉलोवर्स अशा बॅच नोटिफिकेशन्स मिळणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT