Step-by-Step Guide to Making a Diet Plan with ChatGPT esakal
विज्ञान-तंत्र

AI Diet Plan : वजन वाढवायचंय का कमी करायचंय? घरबसल्या बजेटमध्ये बनवा तुमचा डायट प्लॅन; मिनिटांत वापरुन बघा 'हे' AI टुल

Diet Charts on ChatGPT : एआयचा वापर आपण डायट प्लॅन तयार करण्यासाठीही करू शकतो. अमेरिकेतील एका व्यक्तीने चॅटजीपीटीच्या मदतीने आपला डायट प्लॅन तयार केला आणि काही दिवसातच त्याने ११ किलो वजन कमी केले.

Saisimran Ghashi

AI In Health Sector : आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच एआय आपल्या दैनंदिन जीवनात खूप काही करून दाखवत आहे. याच एआयचा वापर तुम्ही डायट प्लॅन तयार करण्यासाठीही करू शकतो. अमेरिकेतील एका व्यक्तीने चॅटजीपीटीच्या मदतीने आपला डायट प्लॅन तयार केला आणि काही दिवसातच त्याने ११ किलो वजन कमी केले.

डायटीशियनकडे जाऊन डायट चार्ट बनवणे किंवा डायट प्लॅन तयार करणे खर्चिक ठरते. पण आता आपल्याकडे चॅटजीपीटी आहे. हे पूर्णपणे विनामूल्य आहे आणि आपल्याला तुमच्या गरजेनुसार डायट प्लॅन तयार करून देऊ शकते.

तुम्हाला वजन कमी करायचे आहे का वाढवायचे आहे? किंवा तुम्हाला फक्त निरोगी आहार घ्यायचा आहे का? यासाठी तुम्ही चॅटजीपीटीचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते जाणून घ्या.

स्टेप 1 : तुम्हाला कश्यासाठी डायट प्लॅन पाहिजे ते ठरवा

तुम्हाला काय करायचे आहे हे ठरवा. वजन कमी करायचे आहे का वाढवायचे आहे? किंवा तुम्हाला फक्त निरोगी आहार घ्यायचा आहे? याबद्दल स्पष्ट माहिती घ्या.

स्टेप 2 : तुमच्या आरोग्याची माहिती द्या

तुमचे वजन, उंची, तुमचे शरीर कसे आहे, तुम्ही किती काळ व्यायाम करता, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अन्नपदार्थाला अ‍ॅलर्जी आहे का? या सगळ्या माहितीचे एक नोट्स तयार करा. यामुळे तुम्हाला चॅटजीपीटीला योग्य प्रश्न विचारण्यास मदत होईल आणि ते तुमच्या गरजेनुसार डायट प्लॅन तयार करेल.

स्टेप 3 : कॅलरीचे लक्ष्य ठरवा

वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी आणि वजन वाढवण्यासाठी जास्त कॅलरी घ्यावी लागतात. पण योग्य प्रमाणात पोषण मिळणेही गरजेचे आहे. तुम्ही ऑनलाइन कॅल्क्युलेटर वापरून किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या कॅलरीचे लक्ष्य ठरवू शकता.

स्टेप 4 : चॅटजीपीटीला प्रश्न विचारा

आता या सगळ्या माहितीचा वापर करून चॅटजीपीटीला प्रश्न विचारा. उदाहरणार्थ, तुम्हाला वजन वाढवायचे आहे, पण तुम्हाला थायरॉईडची समस्या आहे, आणि तुम्हाला महाराष्ट्राचे जेवण आवडते, तर तुम्ही असा प्रश्न विचारू शकता:

"मला ५२ किलो वजन आहे आणि मला थायरॉईडची समस्या आहे. मला महाराष्ट्राचे जेवण आवडते. माझ्यासाठी एक आठवड्याचा महाराष्ट्राच्या जेवणाचा डायट प्लॅन बनवा. त्यात दररोज ३००० कॅलरी असाव्यात, आणि एका जेवणाचे ३० मिनिटांत स्वयंपाक होऊ शकेल असा प्लॅन बनवा. आणि प्रत्येक दिवसाचा खर्च १०० रुपयांपेक्षा जास्त नसावा." (इंग्रजीत भाषांतर करू शकता)

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कॅलरी, आरोग्याच्या समस्या, जेवणाचा वेळ आणि बजेटनुसार डायट प्लॅन तयार करू शकता.

यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे चॅटजीपीटी तुमच्यासाठी चांगला डायट प्लॅन तयार करेल, पण तरीही हा डायट प्लॅन फॉलो करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. कारण chatgpt हे शेवटी एक तंत्रज्ञान आहे. ते स्वतः डॉक्टर नाही.

अशा प्रकारे तुम्हीही चॅटजीपीटीच्या मदतीने तुमचा डायट प्लॅन तयार करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT