Google map speed limit alert speedometer esakal
विज्ञान-तंत्र

Google Maps Speedometer : गाडी चालवताना चुकूनही होणार नाही दंड, गुगल मॅपवर 'असं' सुरू करा स्पीड लिमिटचं अलर्ट फीचर

Google Maps Speed Limit Feature : ड्रायव्हिंग करताना वेग मर्यादा पाळणे खूप महत्वाचे आहे. नाही तर चालान होण्याची शक्यता असते. गुगल मॅप्सचे एक फीचर आहे जे ड्रायव्हिंग करताना रस्त्याची स्पीड लिमिट थेट तुम्हालाच दाखवेल.

Saisimran Ghashi

Google Maps Speed Limit Alert : ड्रायव्हिंग करताना अनेक गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. त्यामध्ये ड्रायव्हिंग करताना वेग मर्यादा पाळणे खूप महत्वाचे आहे. नाही तर दंड होण्याची शक्यता असते. आता Google Maps ने या समस्येवर तोडगा काढलं आहे. गुगल मॅप्सगुगल मॅप्सचे एक फीचर आहे जे ड्रायव्हिंग करताना रस्त्याची स्पीड लिमिट थेट तुम्हालाच दाखवेल. यामुळे आता तुम्हाला स्पीड मर्यादा ओलांडली आहे की नाही याकडे सतत लक्ष ठेवण्याची गरज नाही. कारण Google Maps तुम्हाला सतर्क करेल.

या फीचरचा फायदा असा आहे की, तुम्ही वेग मर्यादा ओलंडण्यापासून आणि चालान होण्यापासून वाचाल. तसेच, अपरिचित परिसरात किंवा रात्रीच्या वेळी रस्ता कोणत्या स्पीडचा आहे हे कळणे कठीण असते. पण आता या फीचरमुळे तुम्हाला रस्त्याची स्पीड लिमिट थेट दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी सुरक्षित राहाल. हे फीचर सध्या फक्त Android फोनवर उपलब्ध आहे. या फीचरचा कसा वापर करायचा ते जाणून घेऊयात.

हे फीचर कसं वापरायचं?

  • आपल्या Android फोनवर Google Maps अॅप उघडा.

  • स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात तुमची प्रोफाइल पिक्चर किंवा पहिले अक्षर दिसेल. त्यावर टॅप करा.

  • खाली येणाऱ्या मेन्यूमधून "सेटिंग्ज" निवडा.

  • सेटिंग्जमध्ये "नेव्हिगेशन सेटिंग्ज" निवडा.

  • "ड्रायव्हिंग ऑप्शन्स" या सेक्शनमध्ये तुम्हाला "स्पीडोमीटर" दिसेल.

  • "स्पीडोमीटर" ऑन करा.

आता तुम्ही Google Maps वर नेव्हिगेशन वापरताना तुमची स्पीड आणि रस्त्याची स्पीड लिमिट थेट दिसणार आहे. जर तुम्ही स्पीड लिमिट ओलांडलात तर Google Maps तुम्हाला रंग बदलून सतर्क करेल.हे फीचर ड्रायविंग करण्यासाठी खूपच चांगले आणि फायदेशीर आहे.

या फीचरमुळे रस्त्यावरचे चालक सुरक्षित राहतील आणि वेग नियंत्रित ठेवू शकतील अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT