Microsoft Copilot Beta Launches on Telegram How to Get Started esakal
विज्ञान-तंत्र

Microsoft Copilot in Telegram : टेलिग्रामला मिळाला 'एआय'चा टच, AI वापरून मिळणार प्रवासाच्या टिप्स, स्पोर्ट्स अपडेट्स

Telegram : दिवसाला ३० प्रश्नांची मर्यादा ; Copilotच्या मदतीने करू शकणार ऍडव्हान्स कम्युनिकेशन

सकाळ डिजिटल टीम

AI in Telegram : हल्ली सगळीकडे AI ट्रेंड सुरु झालाय.वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांच्या ऍप्स साठी AI चे फिचर उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये टेलिग्राम देखील मागे राहिलेले नाही. आता तुम्ही तुमच्या आवडत्या टेलीग्राम अॅपवरुन मायक्रोसॉफ्टचा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) असिस्टंट चॅटबॉट कोपायलटशी संवाद साधू शकणार आहात.

Copilot आता परीक्षणाच्या टप्प्यात असून, तो वापरण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे. या चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही विविध विषयांवर माहिती मिळवू शकता, जसे की प्रवासाविषयी टिप्स, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स, सिनेमांच्याबद्दलच्या शिफारशी आणि बरेच काही फिचर तुम्ही वापरू शकणार आहे.

Copilot वापरण्यासाठी अगदी सोपे आहे.

  • फक्त टेलीग्राम अॅप उघडा आणि सर्च बारमध्ये "@CopilotOfficialBot" असे टाईप करा.

  • पर्याय म्हणून तुम्ही हा लिंक [link to Copilot for Telegram ON Microsoft microsoft.com] देखील वापरू शकता.

  • त्यानंतर "Start" बटण दाबा आणि नियम व अटी स्वीकारा. शेवटी तुमचा फोन नंबर सबमिट केल्यानंतर तुम्ही कोपिलॉटशी संवाद सुरू करू शकता.

Copilot वापरण्याचे फायदे

विविध विषयांवर माहिती मिळवू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता. तुमच्या सर्जनशील लेखनात मदत मिळवू शकता. प्रवासाची आणि मनोरंजनाची योजना बनवू शकता.

Copilot सध्या परीक्षणाच्या टप्प्यात आहे. त्यामध्ये एका दिवसात 30 प्रश्नांची मर्यादा आहे. टेलीग्रामवर आलेला Copilot तुमच्या चॅटिंगचा, माहिती मिळवण्याचा अनुभव अधिक मनोरंजक बनवण्यासाठी सज्ज आहे. आजच कोपिलॉट वापरून पाहा आणि AI च्या मदतीने ऍडव्हान्स कम्युनिकेशन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT