थोडक्यात:
iPhone 15 (128GB) सध्या 12,700 रू. पर्यंतच्या सवलतीसह फक्त 57,190 रू. मध्ये उपलब्ध आहे.
Reliance Digital वर 9,700 रू. ची थेट सूट आणि Amazon वर ICICI कार्डने कॅशबॅक मिळतो.
A16 Bionic चिप, 48MP कॅमेरा आणि 9 तासांचा बॅटरी बॅकअप असलेला हा फोन AI सपोर्टशिवायही दमदार आहे.
iPhone 15 price drop and EMI options in India: iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड Apple चा iPhone 15 सध्या आकर्षक सवलतीसह उपलब्ध झाला आहे. ग्राहकांना या हँडसेटवर एकूण 12,700 रू. पर्यंत बचत करता येणार आहे. काय आहे ही ऑफर एकदा वाचाच.
Reliance Digital आणि Amazon या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ही ऑफर लागू आहे. Reliance Digital च्या वेबसाइटवर iPhone 15 (128GB) मॉडेल सध्या 69,900 रू. ऐवजी 60,200 रू. या किमतीत लिस्ट करण्यात आले आहे. म्हणजेच, यावर थेट 9,700 रू. ची सूट मिळत आहे.
त्यानंतर, Amazon वर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ग्राहकांना 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळत आहे. ही रक्कम सुमारे 3,010 रू. इतकी आहे. जर तुम्ही इतर कोणत्याही पेमेंट मेथडचा वापर केला, तरीही 3 टक्के म्हणजेच 1,806 रू. पर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे.
या सर्व ऑफर्सचा एकत्रित विचार केला असता, iPhone 15 (128GB) केवळ 57,190 रू. मध्ये खरेदी करता येणार असून ही ऑफर iPhone प्रेमींमध्ये चांगलीच चर्चेत आहे.
iPhone 15 मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन A16 Bionic चिपसह सुसज्ज असून, आधीच्या सिरीजच्या तुलनेत अधिक वेगवान आणि कार्यक्षम परफॉर्मन्स देतो.
या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून, कमी प्रकाशातही उत्कृष्ट फोटो काढता येतात.
Apple च्या म्हणण्यानुसार, iPhone 15 चा बॅटरी बॅकअप ‘ऑल डे युसेज’साठी डिझाइन करण्यात आला आहे. तरी प्रत्यक्षात, युजर्सना सुमारे 9 तासांचा बॅटरी बॅकअप मिळू शकतो.
iPhone 15 मध्ये Apple Intelligence म्हणजेच AI सपोर्ट नसला, तरीही सध्या Apple च्या AI सेवा मर्यादितच आहेत. त्यामुळे सध्या iPhone 15 युजर्सना फारसा तोटा जाणवणार नाही.
iPhone 15 पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – गुलाबी, निळा, पिवळा, हिरवा आणि काळा. या किंमतीत Apple चा फ्लॅगशिप फोन घेण्याची ही एक उत्तम संधी मानली जात आहे.
iPhone 15 वर सध्या किती सवलत मिळते? (How much discount is currently available on the iPhone 15?)
➤ iPhone 15 वर एकूण 12,700 रू. पर्यंत सूट मिळते.
ही ऑफर कुठे उपलब्ध आहे? (Where is this iPhone 15 offer available?)
➤ Reliance Digital आणि Amazon या प्लॅटफॉर्मवर ही ऑफर लागू आहे.
कॅशबॅक कोणत्या पेमेंट मेथडवर मिळतो? (Which payment method gives cashback?)
➤ ICICI क्रेडिट कार्ड वापरल्यास 5% कॅशबॅक आणि इतर पद्धतींवर 3% कॅशबॅक मिळतो.
iPhone 15 मध्ये AI फिचर आहे का? (Does the iPhone 15 support AI features?)
➤ सध्या iPhone 15 मध्ये Apple Intelligence (AI) सपोर्ट उपलब्ध नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.