Hyundai Alcazar 2024 Car Features and Price esakal
विज्ञान-तंत्र

Hyundai Alcazar Car Launch : ह्युंदाईने लाँच केली SUV अल्काझार; 7 वर्षांची अनलिमिटेड वॉरंटी,टाटा अन् महिंद्राच्या कारला टक्कर

Hyundai Alcazar 2024 Car Features and Price : ह्युंदाई मोटर इंडियाने एसयूवी सेगमेंटमधील ही कार लॉंच करत बाजी मारली आहे. अभिनेता शाहरुख खान या ब्रँड एसयूव्ही कारचे प्रमोशन करताना दिसत आहेत.

Saisimran Ghashi

Hyundai Alcazar Car : ह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणखी एक महत्वाची भर घालत 2024 अल्काझार लाँच केली आहे. या नव्या अल्काझारची सुरुवातीची किंमत 14.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ-N, टाटा सफारी आणि एमजी हेक्टर प्लस या एसयूव्हींची ही कार थेट स्पर्धक ठरणार आहे.

ह्युंदाई मोटर इंडियाने एसयूवी सेगमेंटमधील ही कार लॉंच करत बाजी मारली आहे. अभिनेता शाहरुख खान या ब्रँड एसयूव्ही कारचे प्रमोशन करताना दिसत आहेत.

ह्युंदाई अल्काझार 2024 ही एक प्रीमियम 6/7-सीटर एसयूव्ही आहे, जी चार व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह, प्रेस्टिज, प्लॅटिनम आणि सिग्नेचर हे 4 व्हेरियंट्स आहेत. नवीन अल्काझारमध्ये बाह्य आणि अंतर्गत डिझाइनमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या एसयूव्हीला नवीन गडद क्रोम ग्रिल, एलईडी हेडलॅम्प्स, आणि कनेक्टेड एलईडी टेललॅम्प्स देण्यात आले आहेत.

Hyundai Alcazar 2024 Car Features and Price

अल्काझारमध्ये 1.5-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत. या वाहनाची पेट्रोल आवृत्ती 17.5 kmpl पर्यंत मायलेज देईल, तर डिझेल आवृत्ती 20.4 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते.

क्लस्टर, 8-स्पीकर बोस साउंड सिस्टम, डिजिटल की, आणि स्मार्टसेन्स लेव्हल 2 ADAS तंत्रज्ञानासह 19 आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या वाहनाच्या सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, आणि हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल यांचा समावेश आहे.

ह्युंदाई अल्काझार 2024 साठी 3 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी आणि रोड साइड असिस्टन्स ऑफर करण्यात येत आहे, ज्यात 7 वर्षांपर्यंत वाढवलेल्या वॉरंटीच्या पर्यायाचा समावेश आहे. ही कार नक्कीच कार प्रेमींना पसंतीस यावी अशी कार आहे. यंदाच्या वर्षातील ही multi फीचर एसयूव्ही ठरण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT