Hyundai Exter
Hyundai Exter esakal
विज्ञान-तंत्र

Hyundai Exter : ह्युंदाईची नवी एसयूव्ही देणार टाटा, मारुती, किआला टक्कर! बुकिंग सुरू

सकाळ डिजिटल टीम

Hyundai Exter : साउथ कोरियाची कार कंपनी ह्युंदाईकडून भारतात लवकरच एक नवीन एसयूव्हीला लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने या एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. सोबत कंपनीने या एसयूव्हीच्या डिझाइनला रिविल सुद्धा केले आहे. आगामी या कारसंबंधी सविस्तर जाणून घ्या.

बुकिंग सुरू

ह्युंदाईने लाँचिंग आधीच नवीन एसयूव्ही एक्सटरसाठी बुकिंग सुरू केली आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या एसयूव्हीला ११ हजार रुपये किंमतीत ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोड मध्ये डीलरशीपकडे जाऊन बुक करू शकता.

किती दमदार इंजिन

कंपनीकडून नवीन एसयूव्हीला तीन पॉवरट्रेनच्या ऑप्शन मध्ये आणले जाणार आहे. १.२ लीटरचे पेट्रोल इंजिन, पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि स्मार्ट ऑटो एएमटी सोबत हे इंजिन इथेनॉल २० कम्प्लाइंट असेल. याशिवाय, एसयूव्हीला सीएनजी सोबत आणले जाणार आहे. यात १.२ लीटर बाय फ्यूल कापा पेट्रोल आणइ सीएनजी इंजिन सोबत पाच स्पीडचे मॅन्युअल ट्रान्समिशन मिळेल.

ह्युंदाईच्या नवीन एसयूव्ही एक्सटर मध्ये एकूण ५ व्हेरियंट ऑफर केले जाऊ शकतात. यात बेस व्हेरियंट ईएक्स असेल. यानंतर एस, एसएक्स, एसएक्स ऑप्शनल आणि एसएक्स ऑप्शन कनेक्ट असतील. एसयूव्हीला ६ मोनोटोन आणि तीन ड्युअल टोन एक्सटिरियर रंगाच्या ऑप्शन मध्ये आणले जाईल. ज्यात कॉस्मेटिक ब्लू आणइ रेंजर खाकी सारख्या नवीन रंगाचा समावेश असेल.

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ह्युंदाई एक्सटर मध्ये एस सिग्नेचरची एलईडी डीआरएल, डायमंड कट अलॉय व्हील्स सारखी फीचर्स मिळतील. सोबत या एसयूव्ही मध्ये १० इंचाहून जास्त मोठी इंफोटेनमेंट टचस्क्रीन, अॅपल कार प्ले, अँड्रॉयड ऑटो, एंबिएंट लाइट, सनरूफ रियर एसी वेंट्स, एबीएस, ईबीडी, एअरबॅग, एचएसए आणि टीपीएमएस सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT