पुणे : व्हाॅट्स अॅपने ग्रुप इन्व्हिटेशन फिचर (Group Invitation feature) ला अपग्रेड केलेलं आहे. या फीचरच्या मदतीने आपल्याला व्हाॅट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होण्यापासून थांबवू शकते. हे फिचर आपल्याला व्हाॅट्स अॅपच्या सेटिंगमध्ये मिळेल.
व्हाॅट्स अॅपमध्ये असं अनेकदा होत की, आपली ईच्छा नसतानासुद्धा आपल्याला एखाद्या व्हाॅट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड केलं जात. काही ग्रुपमध्ये ते खूप त्रासदायकसुद्धा ठरत. कारण आपल्या व्हाॅट्स अॅप ग्रुपमध्ये दिवसभर नोटिफिकेशन येतच राहतात. यामधील इतर परिस्थिती अशी आहे की, जर आपण त्या ग्रुपमधून लेफ्ट झालो तर ग्रुप अॅडमिनला हे वाईट वाटेल असे आपल्याला वाटते. परंतु आता आपल्याला ग्रुपमध्ये नको असल्यास आपण ते टाळू शकतो. आता व्हाॅट्स अॅपने आपल्या ग्रुप इन्व्हिटेशन फिचर (Group Invitation feature) ला अपग्रेड केलेलं आहे. या फीचरच्या मदतीने आपल्याला व्हाॅट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड होण्यापासून थांबवू शकते.
अचानक एखाद्या ग्रुपमध्ये आपल्या परवानगीशिवाय आपल्याला एका ग्रुपमध्ये अॅड केलं जात. परंतु या फीचरनंतर व्हाॅट्स अॅपमध्ये अॅड करण्यापूर्वी आपली परवानगी आवश्यक असणार आहे. आपली इच्छा असल्यास आपण या फीचरला आपल्या कॉन्टैक्टमधील जवळच्या व्यक्तींना कस्टमाइज्ड देखील करू शकता. नवीन व्हाॅट्स अॅप ग्रुप इन्व्हिटेशन फिचर अँडरॉईड (Android) आणि आय.ओ.एस. (iOS) दोन्ही यूजर कर्त्यासाठी उपलब्ध आहेत.
असे करा व्हाॅट्स अॅप ग्रुप इन्व्हिटेशन फिचरला कस्टमाइज्ड...
अँडरॉईड फोनमध्ये...
- सुरुवातीला व्हाॅट्स अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन अकाउंटमध्ये जा. त्यानंतर प्रायवसी वर क्लिक करून ग्रुपमध्ये जावा.
- येथे प्रायवसी सेटिंग्जमधील ग्रुप्स इनविटेशन नियंत्रित करण्यासाठी येथे तीन ऑप्शन्स म्हणजेच Everyone, My Contacts आणि Nobody हे असतील.
- जर तुम्ही Nobody हा ऑप्शन निवडला तर, कोणीही तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करू शकणार नाही. ग्रुपमध्ये अॅड करण्यासाठी सुरुवातीला रिकवेस्ट येईल. आपण ती रिकवेस्ट स्वीकारल्यास, तरच कोणीतरी आपल्याला ग्रुपमध्ये अॅड करण्यास सक्षम असणार आहे.
आयफोन (iPhone) मध्ये....
- व्हॉट्सअॅप उघडल्यानंतर सेटिंग्ज वर जा. त्यानंतर अकाउंट सेक्शनमध्ये गेल्यानंतर प्रायवसी वर क्लिक करून ग्रुपमध्ये जावा.
- त्यानंतर इथे Everyone, My Contacts आणि Nobody हे पर्याय दिसतील. त्यात व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आल्याला कोण अॅड करू शकेल हे येथे आपण आता ठरवू शकता.
- या व्यतिरिक्त, इथे एक ग्रुप लिंक फिचरसुद्धा आहे. आपण या लिंकद्वारे कोणत्याही ग्रुपमध्ये ज्वाइन होऊ शकता. जेव्हा आपण एक ग्रुप तयार करतो, ते त्यावेळी तयार केले गेले आहे.
- आपल्याकडे प्रायवसी ऑप्शनमध्ये Nobody ऑप्शन ला सिलेक्ट केल्यावर हे ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी वापरले जाऊ शकते.
अशाप्रकारे तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुप इनविटेशन फीचरचा वापर करून कुणालासुद्धा ग्रुपमध्ये अॅड करण्यासाठी थांबवू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.