Screen Apnea eSakal
विज्ञान-तंत्र

Screen Apnea : वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे बदलली श्वासोच्छवासाची सवय; तुम्हीही स्क्रीन पाहत असताना श्वास घ्यायला विसरता का?

Screen Time : वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे, नकळत एक मोठी गोष्ट आपण विसरत चाललो आहे. ही गोष्ट म्हणजे, श्वास घेणं.

सकाळ डिजिटल टीम

आजकाल आपण जाऊ तिथे विविध प्रकारच्या स्क्रीन्स आपल्या समोर असतात. जवळपास सर्व गोष्टी डिजिटलाईज झाल्यामुळे आपण सातत्याने कोणत्या ना कोणत्या डिजिटल स्क्रीनसमोर असतो.

यात मग आपला मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप यांचा समावेश होतोच; मात्र विविध सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्क्रीनचा देखील समावेश होतो. आज अगदी तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलात, तरी समोर स्क्रीनवर मेन्यू पाहून ऑर्डर करावी लागते. गॅजेट्सच्या अती वापरामुळे आपला स्क्रीन टाईम वाढला आहे.

या वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे, नकळत एक मोठी गोष्ट आपण विसरत चाललो आहे. ही गोष्ट म्हणजे, श्वास घेणं. खरं वाटत नाही ना? मात्र जरा विचार करा, बऱ्याच वेळा आपण स्क्रीनवर काहीतरी महत्त्वाची गोष्ट पाहत असताना, किंवा महत्त्वाचा मेसेज वाचत असताना श्वास घेताना विसरतो. तुमच्यासोबतही असं होतं का? लेखक जेम्स नेस्टर यांनी त्यांच्या 'ब्रेथ: द न्यू सायन्स ऑफ अ लॉस्ट आर्ट' या पुस्तकात याबाबत अधिक लिहिलं आहे.

श्वासोच्छवासाची पद्धत बदलली

स्क्रीन टाइम वाढल्याने, आपल्या श्वासोच्छवासाची पद्धत देखील बदलली आहे. जेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वस्तूचा सामना करावा लागतो तेव्हा आपली मज्जासंस्था धोका आहे की नाही हे समजण्यासाठी सिग्नल शोधते, असे चॅपल हिल येथील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील मानसोपचारशास्त्राचे प्राध्यापक स्टीफन पोर्जेस यांनी सांगितले.

ई-मेल तपासताना हृदयाचा अभ्यास

दिवसभरात तुम्ही जे काम करता ते जास्त तणावपूर्ण नसलं तरी तुम्हाला कामानंतर थकवा जाणवू शकतो. मायक्रोसॉफ्टच्या माजी कार्यकारी लिंडा स्टोन यांनी एक प्रयोग केला होता. त्यांनी 200 लोकांना आपल्या घरी बोलावलं, आणि त्यांना त्यांचे ई-मेल तपासायला सांगितले.

हे काम करत असताना लिंडा यांनी त्यांच्या हृदयाची गती आणि श्वासोच्छवासाचे निरीक्षण केले आणि त्यांना आढळले की सुमारे 80% लोक वेळोवेळी त्यांचा श्वास रोखून धरतात किंवा त्यांच्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीत बदल होतो.

त्यांनी या गोष्टीला ई-मेल अ‍ॅप्निया असे नाव दिले. नंतर, जेव्हा त्याच्या लक्षात आले की आपला श्वासोच्छवासाचा पॅटर्न केवळ मेल चेक करतानाच नाही तर स्क्रीनवर काहीही करताना देखील बदलतो, तेव्हा त्यांनी याचं नाव बदलून स्क्रीन-अ‍ॅप्निया असे नाव दिले.

असा कमी करा डोळ्यांचा तणाव

खरं तर स्क्रीन टाईम कमी करणं ही आज महत्त्वाची गरज झाली आहे. यासाठी तुम्ही 20-20-20 नियमाचा वापर करू शकता. याचा अर्थ, 20 मिनिटं स्क्रीनवर काम केल्यानंतर, 20 सेकंदांचा ब्रेक घ्या; आणि स्क्रीनपासून नजर हटवून 20 मीटर दूर असणाऱ्या एखाद्या गोष्टीकडे पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Thane: भिवंडीच्या विकासाला नवी दिशा! घराणेशाहीला नकार; बदलाच्या राजकारणाला मतदारांची साथ, काँग्रेसचा शिलेदार उपमहापौरपदी विराजमान

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

SCROLL FOR NEXT