India - china Sakal
विज्ञान-तंत्र

India-China Tawang Clash: भारत-चीन संघर्षानंतर केंद्रानं यापूर्वी उचललं होतं मोठं पाऊल; आता काय?

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारत-चीन सैन्यात झटापट झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत जवळपास ३० जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Akash Ubhe

India-China Clash: वर्ष २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या झटापटीच्या घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. आता अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे दोन्ही सैन्य एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळाले. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. चर्चेच्या माध्यमातून सीमावादावर तोडगा काढण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता.

९ डिसेंबर रोजी दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांना भिडल्याचे समोर आले आहे. या घटनेत दोन्ही देशांचे जवान जखमी झाले आहेत. जवळपास ३० जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

२०२० च्या घटनेची पुनरावृत्ती

याआधी जून २०२० मध्ये देखील भारत-चीन सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यामध्ये दोन्ही देशातील सैन्यात संघर्ष उफाळला होता. चीनी सैन्यांकडून करण्यात येणाऱ्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांकडून हाणून पाडण्यात आला होता. या घटनेत २० भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता.

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनेच्या सीमेवर - लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोलवर सैन्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. या घटनेनंतर भारत सरकारने कठोर पावले उचलत चीनवर डिजिटल स्ट्राइक करत अनेक अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.

शेकडो चीनी अ‍ॅप्सवर घातली होती बंदी

भारत-चीन सीमेवरील तणावानंतर केंद्र सरकारने जवळपास ५९ चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. भारतात लोकप्रिय असलेल्या या अ‍ॅप्सवर बंदी घालत भारताने चीनला मोठा दणका दिला होता. यामध्ये टिकटॉक, शेअर इट, कॅमस्कॅनर, हॅलो सारख्या जवळपास ५९ चीनी अ‍ॅप्सचा समावेश होता. यानंतर देखील सरकारने टप्प्या टप्प्याने इतर धोकादायक चीनी अ‍ॅप्सवर भारतात बंदी घातली होती. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आतापर्यंत जवळपास 300 हून अधिक चिनी अ‍ॅप्स बॅन केले आहेत.

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या अ‍ॅप्सवर बंदी घालताना सुरक्षेचे कारण दिले होते. देशाच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेसाठी हे अ‍ॅप्स धोकादायक असल्याने बंदी घालण्यात आल्याचे सरकारने म्हटले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा झालेल्या या घटनेनंतर सरकार काय पाऊल उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT