India Spy Satellite eSakal
विज्ञान-तंत्र

India Spy Satellite : भारताचा पहिला खासगी हेरगिरी उपग्रह लाँचसाठी सज्ज; 'टाटा'ने केली निर्मिती, 'स्पेस-एक्स' करणार प्रक्षेपण - रिपोर्ट

TASL Spy Satellite : हा उपग्रह सध्या भारतात असून, लाँचसाठी तो फ्लोरिडाला पाठवण्यात येणार आहे. या उपग्रहासाठी बंगळुरूमध्ये ग्राउंड कंट्रोल सेंटर उभारण्यात येत आहे.

Sudesh

India's First Spy Satellite made by Private Player : भारतात खासगी कंपनीने तयार केलेला पहिला हेरगिरी उपग्रह आता प्रक्षेपणासाठी सज्ज झाला आहे. या उपग्रहाचा वापर गोपनीय माहिती मिळवण्यासाठी सैन्याकडून केला जाणार आहे. टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेडने (TASL) हा उपग्रह तयार केला आहे. इलॉन मस्कच्या 'स्पेस एक्स' (SpaceX) कंपनीच्या रॉकेटमधून याचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. साधारणपणे एप्रिलमध्ये हे लाँच पार पडेल.

हा उपग्रह (Tata Spy Satellite) सध्या भारतात असून, लाँचसाठी तो फ्लोरिडाला पाठवण्यात येणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्द केलं आहे. या उपग्रहासाठी ग्राउंड कंट्रोल सेंटर हे बंगळुरूमध्ये उभारण्यात येत आहे. हे लवकरच कार्यरत होईल. उपग्रहाने पाठवलेल्या फोटोंचे प्रोसेसिंग करण्यासाठी या सेंटरचा वापर होईल. यासाठी सॅटेलॉजिक ही लॅटिन-अमेरिकन कंपनी सहकार्य करत असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.

काय होणार फायदा?

यापूर्वी आपल्या सैन्याला जमीनीवरील कोऑर्डिनेट्स आणि वेळेची अचूक माहिती मिळवण्यासाठी विदेशी उपग्रहांवर अवलंबून रहायला लागत होतं. मात्र, आता या स्वदेशी उपग्रहामुळे भारत स्वतःच मॉनिटरिंग करू शकणार आहे. यामुळे सैन्याला पूर्ण ग्राउंड कंट्रोल मिळणार आहे. TASL उपग्रहाने दिलेली माहिती ही भारत आपल्या मित्र राष्ट्रांना देखील पुरवणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमध्ये मिळाली आहे.

भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोचे (ISRO) कित्येक उपग्रह इमेजरी डेटा पाठवू शकतात. मात्र, ही माहिती गुप्तचर खात्याची निकड पूर्ण करू शकत नाही. भारत सध्या हेरगिरी करण्यासाठी अमेरिकेतील कंपन्यांच्या उपग्रहांची मदत घेतो आहे. चीन सीमेवर सातत्याने होत असलेल्या वादामुळे स्वदेशी हेरगिरी उपग्रहाची गरज आणखी प्रखरतेने जाणवत आहे. अशात हा उपग्रह भारताला फायद्याचा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News : पाच किलोमीटर गाडी ढकलणार पण पेट्रोल नाही भरणार! सीमकार्डनंतर आता JIO पंपावरही कोल्हापूरकरांचा बहिष्कार...पाहा VIDEO

हा चेहरा नेमका कोणाचा? ‘दशावतार’च्या गूढ पोस्टरमागे दडलेलं रहस्य १२ सप्टेंबरला उलगडणार!

Latest Marathi News Updates Live : सोलापूर रेल्वे स्थानकावर शॉर्टसर्किटमुळे आग

SSC Disclosure Scheme: अंतिम यादीत नाव नाही? तरीही मिळू शकते सरकारी नोकरी! SSC च्या नव्या योजनेमुळे मिळणार संधी

Sanjay Raut : ''मराठीसाठी हिंसाचार करणार, काय उखडायचं ते उखडा''; संजय राऊतांचे फडणवीसांना ओपन चॅलेंज, वेगळ्या विदर्भाबाबतही केला मोठा दावा...

SCROLL FOR NEXT