Ola's Stand on Hiring Women Amid Foxconn Controversy esakal
विज्ञान-तंत्र

OLA Announcement : अ‍ॅपल सप्लायर्सने विवाहित महिलांना नोकरी नाकारली, पण आम्ही... ओलाच्या सह-संस्थापकांनी केली मोठी घोषणा

Foxconn Controversy : देशातील आघाडीच्या टेक कंपनी फॉक्सकॉनच्या महिलांना नोकरी देण्यासंबंधी भेदभावपूर्ण धोरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Saisimran Ghashi

OLA : देशातील आघाडीच्या टेक कंपनी फॉक्सकॉनच्या महिलांना नोकरी देण्यासंबंधी भेदभावपूर्ण धोरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओला (ola) यांचे मत मात्र फॉक्सकॉनच्या अगदी उलटे आहे.

ओलाचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक भाविश अग्रवाल यांनी स्पष्ट केलं आहे की, कंपनी त्यांच्या नवीन कारखान्यात महिलांना, त्यातही लग्नागच्या महिलांनाही मोठ्या प्रमाणात संधी देणार आहे. ओलामध्ये विवाहित महिलांना नोकरी देण्यावर कोणतीही बंदी नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

“महिला कर्मचारी अधिक शिस्तबद्ध आणि कुशल असतात. आमच्या कारखान्यात आम्ही महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत राहणार आहे. फॉक्सकॉनसारखी विवाहित महिलांना नोकरी नाकारण्याची धोरण आमच्याकडे नाही,” ("not hiring married woman") असं अग्रवाल यांनी सांगितलं.

देशातील महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सध्या आम्ही जरी प्रामुख्याने पदवीधर पदांसाठी महिला कर्मचारी भरती करत असलो, तरी वरिष्ठ व्यवस्थापनातही महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यापूर्वी ओला इलेक्ट्रिकच्या ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं, “मला आज अभिमानाने सांगायचे आहे की, ओला फ्यूचरफॅक्टरी पूर्णपणे महिलांनी चालवली जाणार आहे. आम्ही या आठवड्यात पहिल्या बॅचचे स्वागत केले असून पूर्ण क्षमतेने ही फॅक्टरी सुरू झाल्यावर येथे 10,000 पेक्षा जास्त महिला कामगार काम करतील. ही जगातील सर्वात मोठी महिला कंपनी आणि जागतिक स्तरावरची एकमेव महिला-चलित वाहन निर्माणाची सुविधा असेल.”

याशिवाय कंपनीने यूट्यूबवर एक छोटी क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांचे अनुभव दाखवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

Jogendra Kawade : फलटण प्रकरणात पडद्यामागील सूत्रधारांचा पण तपास करा

World Cup 2025: टीम इंडियाला धक्का! सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावल जखमी, चालू सामन्यात सोडावं लागलं मैदान; BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT