Cyber Attacks in India eSakal
विज्ञान-तंत्र

आशियामध्ये सर्वाधिक सायबर अटॅक होणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर; हल्ल्यांमध्ये 15 टक्क्यांची वाढ - रिपोर्ट

सायबर सिक्युरिटी फर्म असणाऱ्या चेक पॉइंटने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. आशिया-पॅसिफिक भागात तैवान या देशावर 2023 साली सर्वाधिक सायबर हल्ले झाले.

Sudesh

Cyber Attacks in India : तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्याच वेगाने सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. जगभरातील सायबर गुन्हेगार हे भारताला आपलं लक्ष्य करत आहेत. आशिया-पॅसिफिक प्रांतामध्ये सर्वाधिक सायबर अटॅक झालेल्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक असल्याचं एका रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे.

सायबर सिक्युरिटी फर्म असणाऱ्या चेक पॉइंटने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. आशिया-पॅसिफिक भागात तैवान या देशावर 2023 साली सर्वाधिक सायबर हल्ले झाले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत देश होता. 2022 च्या तुलनेत भारतावर 2023 मध्ये 15 टक्के अधिक सायबर हल्ले झाल्याचं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोणत्या क्षेत्रात किती हल्ले?

2023 देशातील वर्षात भारतातील प्रत्येक संस्थेवर दर आठवड्याला सरासरी 2,138 सायबर हल्ले झाले. 2022 च्या तुलनेत ही संख्या 15 टक्क्यांनी अधिक होती. तैवानमध्ये ही संख्या आठवड्याला 3,050 हल्ले एवढी होती.

भारतातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित संस्थांवर सर्वाधिक हल्ले करण्यात आले. अर्थात, 2022 च्या तुलनेत यामध्ये 12 टक्क्यांनी घट दिसून आली आहे. त्यानंतर रिटेल आणि होलसेल सेक्टरवरील हल्ल्यांमध्ये 22 टक्के वाढ झाली. त्यामुळे हे सेक्टर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. हेल्थकेअर सेक्टरवरील हल्ल्यात देखील तीन टक्क्यांची वाढ दिसून आली.

जगभरातील हल्ल्यांमध्ये वाढ

जगभरातील प्रत्येक संस्थेवर आठवड्याला सरासरी 1,158 सायबर हल्ले झाले. 2022 च्या तुलनेत यामध्ये एक टक्का वाढ दिसून आली. जागतिक स्तरावर आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये सर्वाधिक हल्ल्यांची नोंद झाली. तर, दुसऱ्या क्रमांकावर आफ्रिका होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026: पाकिस्तान स्पर्धेतून 'आऊट'? न्यूझीलंडच्या विजयाने वाढवलंय टेन्शन, पाहा कसं आहे समीफायनलसाठी समीकरण

Solapur News: चक्क.. सरकारी जागांची खरेदी-विक्री; आ. विजय देशमुखांनी विधानसभेत उठवला आवाज, साेलापूर जिल्ह्यात नेमकं काय घडलं!

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गात बदल निश्चित! सोलापूर जिल्ह्यापासून नवा मार्ग, मुख्यमंत्र्यांनी सांगितला कसा असेल बदल..

Viral Video: याला म्हणतात नशिबाची फिरकी! Window Seat बुक करूनही मिळाला धक्का; व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्रीची हिंदी मालिकेत एंट्री; दिसणार भयानक अवतारात; प्रोमो पाहून प्रेक्षक थक्क

SCROLL FOR NEXT