India E-Waste eSakal
विज्ञान-तंत्र

India E-Waste : इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण करण्यात भारत तिसरा; केंद्राच्या माजी सल्लागाराची माहिती

शाश्‍वत कचरा व्‍यवस्‍थापन, पुनर्वापर, ‘टेक-मेक-मेक’ हे आर्थिक चक्र फायदेशीर ठरू शकते असे सांगत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाद्वारे सुरू असलेल्‍या विविध पर्यावरण संवर्धन विषयक योजनांची माह‍ितीही जिंदल यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

India E-Waste Generation : पर्यावरणाच्‍या सर्व समस्‍या उपभोगवादाशी संबंधित आहे. पृथ्‍वीवरील स्‍त्रोतांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारताची लोकसंख्‍या झपाट्याने वाढत असल्याने कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. जगात प्लॅस्टिक कचरा निर्माण करण्‍यात भारताचा पाचवा तर ई-वेस्‍ट तयार करण्‍यात तिसरा क्रमांक लागतो, अशी माहिती केंद्राच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदलाच्या माजी सल्लागार संचिता जिंदल यांनी दिली.

एल. ए. डी. आणि श्रीमती आर. पी. महिला महाविद्यालयात शनिवारी ‘ग्रीन अर्थ - क्लीन अर्थ’ विषयावर राष्ट्रीय परिषदेतील ‘वेस्‍ट मॅनेजमेंट फॉर क्लीन अँड ग्रीन अर्थ’ विषयावर त्या बोलत होते. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, विमेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, महाविद्यालयाच्‍या प्राचार्य डॉ. पूजा पाठक, उपप्राचार्य डॉ. किरण पाटील व डॉ. रिजूता बापट, संयोजक डॉ. दीपाली चहांदे यांची उपस्‍थ‍िती होती.

शाश्‍वत कचरा व्‍यवस्‍थापन, पुनर्वापर, ‘टेक-मेक-मेक’ हे आर्थिक चक्र फायदेशीर ठरू शकते असे सांगत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाद्वारे सुरू असलेल्‍या विविध पर्यावरण संवर्धन विषयक योजनांची माह‍ितीही जिंदल यांनी दिली.

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. दुधे यांचेही भाषण झाले. पूजा पाठक यांनी स्‍वागतपर भाषण केले तर दीपाली चहांदे यांनी परिषदेच्‍या संकल्‍पनेसंदर्भात माहिती दिली. दुपारच्‍या ‍तांत्रिक सत्रांमध्‍ये डॉ. विशाल सरदेशपांडे, डॉ. राहुल राळेगावकर, डॉ. उत्तरा पांडे, मुकुंद पात्रीकर, प्रवीण मोते व डॉ. अनुपमा कुमार यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. तुतू सेनगुप्‍ता, डॉ. नंदा राठी, डॉ. संगीता सहस्‍त्रबुद्धे यांनी शोधनिबंध सादर केले.

समारोपाला नागपूर वन विभागाच्या वनसंरक्षक श्रीलक्ष्‍मी अन्‍नाबथुला आणि विमेन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश देशमुख उपस्‍थ‍ित होते. यावेळी तनवीर म‍िर्झा, आनंद भवाळकर व प्रशांत वानखेडे यांचा सत्‍कार करण्‍यात आला. मृणालिनी ठोंबरे यांनी अहवाल सादर केला. मीनाक्षी कुळकर्णी यांनी संचालन केले तर संयो‍जक प्रचिती बगाडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT