Indian Army Acquires Indigenous 'Nagastra-1' Drones esakal
विज्ञान-तंत्र

'Nagastra-1' Drone : भारतीय लष्कराच्या हाती नवे ड्रोनअस्त्र; जाणून घ्या ‘नागास्त्र-१’ काय आहे,व्हायरल होतोय व्हिडीओ

Indian Army Drone : नागपूरस्थित कंपनीने बनवला पहिला स्वदेशी आत्मघाती ड्रोन

Saisimran Ghashi

Delhi : भारतीय लष्कराने आत्मनिर्भरतेच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले असून स्वदेशी बनावटीचे आत्मघाती ड्रोन ‘नागास्त्र-१’ हे आता भारतीय लष्कराच्या भात्यामध्ये समाविष्ट झाले आहे. नागपूरस्थित कंपनी ‘सोलर इंडस्ट्रीज’च्या ‘इकोनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड युनिट’ने त्याची निर्मिती केली आहे.

लष्कराने अशा प्रकारच्या ४८० ड्रोनची ऑर्डर दिली होती. आतापर्यंत १२० ड्रोनची डिलिव्हरी पूर्ण झाली आहे. ‘सायलेंट मोड’मध्ये बाराशे मीटर उंचीवर हे ड्रोन उड्डाण करू शकते. शत्रू राष्ट्राच्या हद्दीमध्ये अलगद प्रवेश करत लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता त्याच्यात आहे.

ड्रोनची वैशिष्ट्ये

  • ३० किलोमीटरमारक क्षमता

  • ६० मिनिटांपर्यंत हवेत राहू शकते

  • २ कि.ग्रॅपर्यंतची स्फोटके वाहूननेण्याची क्षमता

  • लक्ष्यभेद न झाल्यास माघारी बोलावता येते

* यावर थेट प्रहार

शत्रू राष्ट्रांची प्रशिक्षण केंद्रे

दहशतवाद्यांची ठाणी

अमेरिकेने दिले होते ड्रोन

अमेरिकेने चार महिन्यांपूर्वीच भारताला ३१‘ एमक्यू-९बी’ हे ड्रोन देण्याचा निर्णय घेतला होता. या ड्रोनची किंमत ३.९९ अब्ज डॉलर (३३ हजार कोटी रुपये) एवढी आहे. चीनला लागून असलेली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि भारताची सागरी हद्द यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT