Mobile Addiction in Kids eSakal
विज्ञान-तंत्र

Mobile Addiction : शहरातील 61 टक्के लहान मुलांना मोबाईलचं व्यसन; ऑनलाईन गेमिंग, सोशल मीडियावर जातोय सर्वाधिक वेळ

Social Media Addiction : लोकल सर्कल्स नावाच्या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

Sudesh

सध्या लहान मुलांमध्ये मोबाईलचं व्यसन दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंग आणि OTT प्लॅटफॉर्म्सवर मुलं सर्वाधिक वेळ वाया घालवत आहेत. यामुळेच मुलांमध्ये चिडचिडेपणा आणि आळशीपणा वाढत असल्याचं समोर आलं आहे.

लोकल सर्कल्स नावाच्या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात असं समोर आलं आहे, की शहरी भागातील 61 टक्के लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलं आहे. या सर्वेक्षणात 296 जिल्ह्यांतील सुमारे 46,000 पेक्षा अधिक पालकांनी आपली प्रतिक्रिया दिली. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सहा तासांहून अधिक वेळ

यातील 61 टक्के पालकांनी सांगितलं, की त्यांची मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल घेऊन बसतात. यातील बहुतांश वेळ हा गेमिंग किंवा सोशल मीडियावर जातो. 39 टक्के पालकांनी सांगितलं, की त्यांची मुलं 1 ते 3 तास मोबाईल घेऊन बसतात. 46 टक्के पालकांनी हे प्रमाण 3-6 तास असल्याचं सांगितलं, तर 15 टक्के पालकांनी हे प्रमाण 6 तासांहून अधिक असल्याचं सांगितलं.

सुधारणेसाठी प्रयत्न

लोकल सर्कल्स ही सर्वेक्षणाची आकडेवारी आता भारत सरकारला देणार आहे. सूचना आणि प्रसारण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच महिला आणि बाल विकास मंत्रालयाला हीी माहिती दिली जाणार आहे. ज्यामुळे, लहान मुलांमधील या वाढत्या समस्येवर काही तोडगा काढता येईल.

पालकांची मागणी

या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 73 टक्के पालकांनी म्हटलं, की डेटा संरक्षण कायद्यामध्ये या समस्येबाबत तरतूद हवी. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडिया, ओटीटी किंवा गेमिंग प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पालकांची परवानगी घेणं बंधनकारक करायला हवं, अशी मागणी पालकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT