Action Against Parcel Scams Govt Encourages Reporting Suspicious Call esakal
विज्ञान-तंत्र

Parcel Scam : तुम्हीही होऊ शकता पार्सल स्कॅमचे शिकार ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Cyber Crime : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीविरुद्ध सरकार कठोर कारवाई करण्यासाठी सज्ज

सकाळ डिजिटल टीम

Online Fraud : देशात वाढत्या ऑनलाइन फसवणुकीविरुद्ध सरकार कठोर कारवाई करण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेषत: पार्सल घोटाळा रोखण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या फसवणुकीमुळे गेल्या काही महिन्यांत लाखो लोकांची फसवणूक झाली आहे.

काय आहे पार्सल घोटाळा?

फसवणुकर सोशल मीडियाद्वारे तुमच्याशी संपर्क साधतात आणि नंतर बनावट कॉल करून तुमची फसवणूक करतात. या बनावट कॉलमध्ये ते तुम्हाला एखाद्या गुन्हेगारी संस्थेचे अधिकारी असल्याचे सांगतात. तुमच्या नावावर अवैध वस्तू असलेले पार्सल अडवलं असल्याचे सांगून ते तुमच्याकडून पैशांची मागणी करतात. कधी कधी तुमच्या एखाद्या नातेवाईकांना अटक केल्याचे बनावट कॉलही ते करतात.

बनावट कॉल रोखण्यासाठी सरकारने भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) आणि दूरसंचार विभागा (DoT) सोबत काम सुरु केलं आहे. यामुळे परदेशातून येणारे बनावट कॉल रोखण्यात मदत होईल.

सरकारी लोगोचा गैरवापर रोखण्यासाठी I4C मायक्रोसॉफ्टसोबत काम करत आहे. अनेकदा फसवणूक करणारे सरकारी लोगो वापरून तुमचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतात.

संशयास्पद कॉल किंवा संदेश आल्यास त्यांची माहिती cybercrime.gov.in या संकेतस्थळावर द्या. यामुळे सरकारला फसवणूक रोखण्यास मदत होईल,असे आवाहन करण्यात आले आहे.

तुम्ही स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकता?

कोणत्याही अज्ञात व्यक्तीकडून फोन आला तर त्याची ओळख पटवून घ्या. तात्काळ पैशांची किंवा संवेदनशील माहिती देण्याची मागणी करणाऱ्या फोनवर विश्वास ठेवू नका.

संशयास्पद कॉल, संदेश किंवा संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तींची माहिती cybercrime.gov.in या संकेतस्थळावर द्या.

फोनवर कधीही तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करू नका. फोन करणाऱ्याची ओळख पूर्णपणे खात्री झाल्याशिवाय माहिती देऊ नका

सरकारने वेळोवेळी जारी केलेल्या सूचना आणि फसवणुकीपासून वाचण्याच्या उपायांची माहिती घेतली पाहिजे. सरकारच्या या कठोर कारवाईमुळे आणि तुमच्या सतर्कतेमुळे ऑनलाइन फसवणूक रोखणे शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT