Mobile Virus Removal Tool Esakal
विज्ञान-तंत्र

Mobile Virus : मोबाईलमधील व्हायरस काढण्यासाठी केंद्र सरकार देतंय मोफत टूल, असं करा डाऊनलोड

केवळ मोबाईलच नाही, तर कम्प्युटरच्या सुरक्षेसाठीही सरकारने पावलं उचलली आहेत.

Sudesh

सध्या मोबाईलमध्ये मालवेअर किंवा व्हायरस यांच्या माध्यमातून फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. हॅकर्स नवनवीन प्रकारचे व्हायरस तयार करून मोबाईलची सिक्युरिटी भेदण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच, नागरिकांच्या डिजिटल सुरक्षेसाठी केंद्र सरकारने पाऊल उचललं आहे.

केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने (DoT) मोबाईलमधील व्हायरस काढण्यासाठी काही टूल्स लाँच केले आहेत. हे टूल्स नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासंदर्भात माहिती देण्यासाठी सरकार सर्व नागरिकांना टेक्स्ट मेसेजही करत आहे.

केंद्राचा टेक्स्ट मेसेज

केंद्र सरकार सध्या नागरिकांना एक मेसेज करत आहे. "सायबर सुरक्षित रहा! आपल्या डिव्हाईसला बॉटनेट संक्रमण आणि मालवेअरपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सीईआरटी-इन, भारत सरकार हे फ्री बॉट रिमूव्हल टूल डाऊनलोड करण्याचा सल्ला देतंय." अशा आशयाचा हा मेसेज आहे. यामध्ये हे टूल डाऊनलोड करण्यासाठी लिंकही देण्यात आली आहे.

Mobile Virus Removal Tool

काय आहे हे टूल?

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सायबर स्वच्छता केंद्र पोर्टलच्या माध्यमातून यूजर्स मोफत मालवेअर डिटेक्शन टूल्स वापरू शकणार आहेत. या टूल्सच्या मदतीने तुमच्या फोनमधील व्हायरस ओळखता येईल. हे पोर्टल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाईडर आणि अँटीव्हायरस कंपन्यांसोबत मिळून काम करतं. भारत सरकारच्या कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमच्या (CERT-In) नियंत्रणात हे पोर्टल आहे.

असा करा वापर

तुमच्या मोबाईलमध्ये असणारे मालवेअर काढून टाकण्यासाठी सर्वात आधी www.csk.gov.in/ या वेबसाईटवर जा. यानंतर सिक्युरिटी टूल्स या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ज्या कंपनीचे बॉट रिमूव्हल टूल तुम्हाला वापरायचं आहे, त्या कंपनीची निवड करा. त्यानंतर समोर दिसणाऱ्या डाऊनलोड बटणावर क्लिक करा. यानंतर हे अ‍ॅप सुरू करा. हे अ‍ॅप तुमच्या मोबाईलला स्कॅन करून व्हायरस किंवा मालवेअर डिटेक्ट करेल.

कम्प्युटरची सुरक्षा

केवळ मोबाईलच नाही, तर कम्प्युटरच्या सुरक्षेसाठीही केंद्र सरकारने पावलं उचलली आहेत. CSK पोर्टलवर USB Pratirodh आणि AppSamvid हे दोन अ‍ॅप्स देण्यात आले आहेत. आपल्या कम्प्युटरमध्ये हे दोन अ‍ॅप्स डाऊनलोड करून तुम्ही पीसी सुरक्षित करू शकता. USB Pratirodh हे अ‍ॅप तुमच्या पीसीला जोडल्या जाणाऱ्या रिमूव्हेबल स्टोरेज मीडियाला स्कॅन करतं. तर, AppSamvid हे अ‍ॅप तुमच्या पीसीमध्ये केवळ सुरक्षित जावा फाईल्स चालतील याची खबरदारी घेतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri drowning Incident : पावसजवळील गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं पण...; जिवापाड जपलेला मुलगाच गेला

Karad Crime : शेणोलीजवळ सिग्नलवर लाल फडके टाकुन प्रकार सह्याद्री एक्सप्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; अज्ञात चौघाविरोधात गुन्हा

Latest Marathi News Live Update : पन्हाळा : अल्पवयीन मुलाकडून दुचाकीने धडक दिलेल्या वृद्धाचा मृत्यू, मुलासह वडिलांवर गुन्हा

Motor Vehicle Rule: चालकांना दिलासा! आता अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

SRH VS PBKS RESULT: पंजाबचा सर्वात मोठा विजय; हैदराबादला पराभूत करून IPL 2026 Point Table मधील पकड केली मजबूत

SCROLL FOR NEXT