bike double seat 
विज्ञान-तंत्र

गाडीवर मागे बसणाऱ्यासाठी होणार बदल, सरकारचा नवा आदेश

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षामध्ये रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सुरक्षा लक्षात ठेवून अनेक नियम बदलले आहेत. यातील काही नियम लागूसुद्धा करण्यात आले आहेत. मंत्रालयाने आता नवी नियमावली प्रसिद्ध केली असून दुचाकीवरून जाणाऱ्यांसाठी हे नियम असणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती घेऊ. 

मंत्रालयाच्या नियमावलीनुसार दुचाकीच्या दोन्ही बाजूला चालकाच्या सीटच्या मागे हँड होल्ड असतील. मागे बसणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी हे लावण्यात येणार आहेत. आतापर्यंत अनेक बाइकमध्ये अशी सुविधा नव्हती. यासह मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी दोन्ही बाजूला फूट रेस्ट बंधनकारक करण्यात आले आहेत. याशिवाय बाइकच्या मागील चाकाच्या डाव्या बाजुला गार्ड लावण्यात यावा. ज्यामुळे मागे बसणाऱ्यांचे कपडे मागच्या चाकामध्ये अडकणार नाहीत. आजतकने या नव्या नियमावलीच्या फोटोसह वृत्त दिले आहे.

मंत्रालयाने दुचाकीमध्ये लहानसा कंटेनरही लावण्याचे आदेश दिले आहेत. या कंटेनरची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिमी आणि उंची 500 मिमी पेक्षा अधिक नसावी. सरकार वेळोवेळी या नियमांमध्ये बदल करत राहील असंही म्हटलं आहे. 

याआधीही सरकारने गाडीच्या स्टेफनीबाबत नियमावली जारी केली होती. यानुसार 3.5 टनापर्यंतच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिमचा सल्ला दिला आहे. या सिस्टिममध्ये सेन्सरच्या माध्यमातून ड्रायव्हरला चाकांमधील हवेची स्थिती समजेल. याशिवाय चाक दुरुस्ती करण्याचं किट गाडीत असल्यास स्टेफनी असण्याची आवश्यकता नाही असंही मंत्रालयाने म्हटलं आहे. 

देशात कार्बनच्या उत्सर्जनात होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्राला पर्यावरणाची काळजी लागली आहे. यामुळे भारत इलेक्ट्रिक व्हेइकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाय करत आहे. नव्या सुधारणेनुसार इलेक्ट्रिकल व्हेइकलच्या मोठ्या बॅटरीला ठेवण्यासाठी रिकामी जागा आवश्यक आहे. ज्यामुळे व्हेइकलची रेंजही वाढवता येईल. यासाठी गाडीत स्पेअर टायरची जागा बॅटरीसाठी वापरता येईल. देशात इलेक्ट्रिक व्हेइकल खरेदी कऱणाऱ्यांसमोर मायलेजची सर्वात मोठी चिंता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात; चर्चेत काय घडलं? सरकारकडून आंदोलकांवर शब्द फिरवल्याचा आरोप

Live Updates Marathi : CJP च्या आंदोलनाला ममता बॅनर्जींचा पाठिंबा, सरकारविरोधात एकजूट होण्याचं आवाहन

२३ जुलैला महाराष्ट्र बंदची हाक, दिल्लीतील आंदोलनाचे राज्यभर पडसाद, पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयासमोर प्रदर्शन, तर मुंबईत मनसे रस्त्यावर...

Leopard Attacks: राहू परिसरात बिबट्याचा कहर; दोन गाभण शेळ्या ठार, एक गंभीर जखमी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Petrol-Diesel News: पाकिस्ताननंतर अमेरिकेत पेट्रोल महाग! आता भारतातही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार?

SCROLL FOR NEXT