Sunita Williams Assures Safe Return Amid Boeing Starliner Mission Delay easkal
विज्ञान-तंत्र

Sunita Williams Update : सुनीता विल्यम्सनी अंतराळातून जगाला दिला पहिला मेसेज; म्हणाल्या हे यान आम्हाला...

Sunita Williams Live From Space : अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी (10 जुलै) रात्री 8.30 वाजता नासाच्या लाईव्ह कॉन्फरन्सद्वारे पृथ्वीशी संवाद साधला

Saisimran Ghashi

NASA Update : अमेरिकन अंतराळ संस्थेच्या (NASA) अंतराळयानात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी (10 जुलै) रात्री 8.30 वाजता नासाच्या लाईव्ह कॉन्फरन्समध्ये पृथ्वीवर परत येण्याबाबत आशावाद व्यक्त केला आहे. अंतराळातून पाठवलेल्या संदेशात सुनीता म्हणाल्या, "या अंतराळयानावर माझा विश्वास आहे. आम्हाला सुरक्षितपणे पृथ्वीवर परत घेऊन येईल."

NASA ने काही दिवसांपूर्वी बोइंग स्टारलाइनर या अंतराळयानाचे अवकाशातील वास्तव्य 45 ते 90 दिवसांनी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर सुनीतांचा हा संदेश आला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) एक महिनाहून अधिक काळ वास्तव्य केल्यानंतर ही पहिलीच वेळ सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांना थेट प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

या अंतराळ प्रवासादरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्या असल्या तरी "अपयश हा पर्याय नाही" असे स्पष्ट करत अंतराळवीर बुच विल्मोर यांनी अंतराळ स्थानकावर थांबण्यामागील हेतू फक्त अंतराळयानाची चाचणी घेणे हाच असल्याचे सांगितले. बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स यांना 5 जून रोजी फ्लोरिडातून स्टारलाइनर या अंतराळयानाद्वारे अंतराळात पाठवण्यात आले होते. त्यानंतर ते दुसऱ्याच दिवशी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी यशस्वीरीत्या जोडले गेले.

लाईव्ह सेशनमध्ये सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थांकडून विचारले गेलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि लाईव्हद्वारे अवकाशातील स्थिती बद्दल संपूर्ण जगाशी संवाद साधला तसेच या मिशन मधून अजून बरेच काही चांगले साध्य होणार आहे अशी आशाही दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

Mohol News : अठरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT