Dukaan AI Chatbot eSakal
विज्ञान-तंत्र

Dukaan AI Chatbot : ९० टक्के सपोर्ट स्टाफला काढून एआय चॅटबॉट ठेवले कामाला; भारतातील मोठ्या कंपनीचा निर्णय!

कंपनीचे को-फाऊंडर आणि सीईओ सुमित शाह यांनी याबाबत माहिती दिली.

Sudesh

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स लोकांच्या नोकऱ्या खाणार का, याबाबत सध्या मोठ्या प्रमाणात मत-मतांतरे पहायला मिळत आहेत. चॅटजीपीटी आल्यापासून एआयबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या सगळ्यातच आता भारतातील एका कंपनीने ९० टक्के सपोर्ट स्टाफला काढून, त्याजागी एआय चॅटबॉटची नियुक्ती केली आहे.

ई-कॉमर्स स्टार्टअप असणाऱ्या दुकान या कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीचे को-फाऊंडर आणि सीईओ सुमित शाह यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. हा निर्णय घेणं गरजेचं होतं असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आम्ही आमच्या ९० टक्के सपोर्ट स्टाफच्या जागी एआय चॅटबॉट नेमला आहे. हा निर्णय कठिण होता, मात्र याची गरज होती. आधी आमचा रिस्पॉन्स टाईम १ मिनिट ४४ सेकंद एवढा होता. तो आता एका सेकंदावर आला आहे. तसेच, यूजर्सच्या तक्रारी सोडवण्यासाठी पूर्वी जास्तीत जास्त २ तास १३ मिनिटं लागत होती. ही वेळ आता ३ मिनिटं १२ सेकंद झाली आहे; असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पैशांची बचत

सध्याची जागतिक अर्थव्यवस्था पाहता, कंपन्या युनिकॉर्न बनण्याऐवजी नफा कसा मिळवता येईल याकडे लक्ष देत आहेत. आम्हीदेखील अशाच प्रकारे विचार करतोय. आमच्याकडे कस्टमर सपोर्ट विभाग बऱ्याच काळापासून अडचणीत होता. त्यामुळे आताच हा निर्णय घेण्याची योग्य वेळ होती. यानंतर आमचा कस्टमर सपोर्टवर होणारा खर्च ८५ टक्क्यांनी कमी झाला आहे; असं सुमित यांनी स्पष्ट केलं.

बॉट9 एआय

शाह यांनी यावेळी Bot9 या एआय सर्व्हिसची घोषणाही केली. या माध्यमातून इतर कंपन्यांना चॅटबॉट उपलब्ध करून दिले जातील. कंपन्यांची उत्पादने समजून घेऊन, ग्राहकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणारे हे चॅटबॉट्स असतील. यासाठी ते चॅटजीपीटीची देखील मदत घेतील.

एआय चॅटबॉट लिसा

गेल्याच महिन्यात सुमित यांनी दुकान कंपनीची एआय असिस्टंट 'लिसा'ला सर्वांसमोर आणलं होतं. एका फेसबुक पोस्टमधून त्यांनी याबाबत माहिती दिली होती. यूजर्सना आपल्या अकाउंटबद्दल अधिक माहिती, आणि काही प्रमाणात तक्रारींचे निवारण करण्याचे काम ही चॅटबॉट करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT