Instagram Outage Reason esakal
विज्ञान-तंत्र

Instagram Down Reason : जगभर इंस्टाग्राम डाऊन, मेटा कंपनी स्पष्टीकरण देत काय म्हणाली?

Instagram Global Outage : काल ५:१४ वाजल्यापासून इंस्टाग्राम डाऊन होऊन तांत्रिक बिघाड झाला होता.

Saisimran Ghashi

Instagram Reason : सोशल मीडियाच्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर असलेल्या इंस्टाग्रामला मंगळवारी मोठा फटका बसला. अनेक वापरकर्ते मेसेज पाठवू शकत नसल्याची, तसेच व्हिडिओ अपलोड करता न आल्याची तक्रार करत होते. साधारण ५:१४ वाजल्यापासून हा तांत्रिक बिघाड सुरू असल्याचे Downdetector ने नोंदवले आहे, ज्यावर आत्तापर्यंत २,००० हून अधिक तक्रारी आल्या.

Downdetector च्या अहवालानुसार, ४८% वापरकर्त्यांनी अॅप्लिकेशन समस्या, २७% वापरकर्त्यांनी कंटेंट शेअरिंग समस्या, तर २५% वापरकर्त्यांनी सर्व्हरच्या समस्या असल्याचे नोंदवले गेले. यामुळे अस्वस्थ झालेल्या अनेक वापरकर्त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर आपल्या संताप व्यक्त केला आहे. "तुमच्या DM ला रिप्लाय दिला नाही का? नाही! इंस्टाग्राम बंद पडलं आहे!" अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसत आहेत.

काही वापरकर्त्यांनी "फक्त माझ्याकडेच आहे का की इतर कोणालाही DM पाठवता येत नाही?" अशी विचारणा करत इंस्टाग्रामच्या डाउन असण्याबाबत शंका उपस्थित केली आहे. इंस्टाग्राम बंद असल्याने दोन तासांहून अधिक वेळ उलटला असून, अद्याप Meta कडून अधिकृत निवेदन आलेले नाही. अश्या प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

इंस्टाग्रामवरचा हा बिघाड जागतिक पातळीवर असून नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, वापरकर्त्यांनी लक्षात घ्यावे की, फीड आणि स्टोरीज रीफ्रेश करण्यात कोणतीही अडचण नाही.कंपनी यावर काय बोलते हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोरच्या दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT