Instagram Upgrades 'Limit' and 'Restrict' Features for Teens esakal
विज्ञान-तंत्र

Instagram Anti- Bullying Feature : इंस्टाग्राम बुलिंगला आता फुलस्टॉप ; नवं सुरक्षा फिचर येणार तुमच्या मदतीला!

Instagram Security : 'लिमीट' आणि 'रेस्ट्रिक्ट' (Limit and Restrict) या दोन सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा

सकाळ डिजिटल टीम

Instagram : सोशल मीडिया ऍप वापरताना बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तसेच थ्रेटस आणि हॅरॅसमेंट झाल्याच्या देखील अनेक केसेस आहेत. या सगळ्या गोष्टींना आळा घालून सोशल मीडियाचा वापर सुरक्षितपणे करण्यासाठी संबंधित कंपन्या प्रयत्न करत असतात.

अश्यातच इंस्टाग्रामने देखील इन्स्टाग्राम अॅपवर तरुणांना होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी नवीन पाऊल उचललं आहे. 'लिमीट' आणि 'रेस्ट्रिक्ट' (Limit and Restrict) या दोन सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करुन त्या अधिक प्रभावी बनवल्या आहेत.

आता 'लिमीट' फीचर वापरून युजर्स फक्त त्यांच्या 'क्लोझ फ्रेंड्स' म्हणजे जवळच्या मित्रांच्या कमेंट्स, मेसेजेस, टॅग्स आणि मेन्शन्स पाहू शकतात. म्हणजे एखाद्या अकाउंटवरुन वाईट करताना इतर लोकांनी कमेंट केल्या तरीही त्या युजरला दिसणार नाहीत.

तसेच, 'रेस्ट्रिक्ट' फीचरमध्येही बदल करण्यात आले आहेत. आता युजर ज्यांना 'रेस्ट्रिक्ट' करतात त्यांना त्यांच्या पोस्टमध्ये टॅग करता येणार नाही किंवा त्यांच्याबद्दल लिहिता येणार नाही. इतकेच नव्हे तर त्या लोकांच्या कमेंट्स देखील ऑटोमॅटिकली हायडन होणार आहेत, त्यामुळे इतरांनाही त्या दिसणार नाहीत.

या बदलांमुळे युजर कोणत्या लोकांशी संपर्क करु शकतात आणि कोणत्या नाही यावर त्यांना अधिक नियंत्रण मिळणार आहे. त्यामुळे इन्स्टाग्रामवर त्यांच्यासाठी अधिक सुरक्षित वातावरण तयार होईल अशी कंपनीची अपेक्षा आहे.

कधी एखाद्या युजरला एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे ब्लॉक करायचं नसावं असं वाटतं. कारण त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा विचार करुन 'लिमीट' आणि 'रेस्ट्रिक्ट'सारखे पर्याय देण्यात आले आहेत. या नवीन फीचर्समुळे त्या व्यक्तीला पूर्णपणे काढून न टाताना त्यांच्याशी संपर्क कमी करता येतो.

संपूर्ण जगभरातून पालक आणि सरकारकडून इन्स्टाग्रामवर होणाऱ्या धाडामर्दीवर आणि वाईट गोष्टींपासून युजर्सना वाचवण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात नाहीत, असा आरोप होत होता. याच वर्षी कंपनीवर तरुणांची सुरक्षा न केल्याप्रकरणी खटला सुद्धा दाखल झाला होता.

या प्रकरणानंतर इन्स्टाग्रामने अनेक नवीन फीचर्स आणले आहेत. यात त्यांच्या फॉलोअर्स नसलेले अकाउंट्स अॅडल्ट्सना मेसेज करु शकणार नाहीत याची तरतूद केली आहे. तसेच, अल्पवयस्क युजर्सना पाठवलेल्या मेसेजेसमधील न्यूड इमेजेस आता ब्लर केल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Jalgaon News : गुलाबी थंडीची प्रतीक्षा संपणार! ७ नोव्हेंबरपासून जळगावात थंडीचा जोर वाढणार, तापमान १७ अंशांपर्यंत खाली येणार

Latest Marathi News Live Update : दोन पोलिस अधिकाऱ्यांना केले सेवेतून बडतर्फ

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT