Instagram Latest Features : अमेरिकेत TikTok वर बंदी लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर, Instagram ने आपल्या Reels फिचरमध्ये नवीन बदल करत वापरकर्त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. TikTok बंद झाल्यास तयार होणाऱ्या रिक्ततेचा फायदा उचलण्यासाठी Instagram ने दोन नवीन फीचर्स आणणार असल्याचे जाहीर केले आहे. सध्या हे फीचर्स फक्त अमेरिकेत उपलब्ध असून लवकरच पुढील अपडेटसह इतर देशांमध्येही उपलब्ध होणार आहेत.
Reels टॅबमध्ये आता "Friends’ Interactions" नावाचा एक नवीन विभाग दिसणार आहे. येथे वापरकर्ते त्यांचे मित्र कोणते Reels लाईक किंवा नोट्स अॅड करतात, हे सहज पाहू शकतात. त्यामुळे नवीन आणि आकर्षक कंटेंट शोधणे सोपे होणार आहे.
Reels वर मित्रांच्या लाईक्स किंवा नोट्सला थेट उत्तर देण्यासाठी Instagram ने रिप्लाय बार आणला आहे. यामुळे वापरकर्त्यांना अधिक संवाद साधता येईल आणि त्यांचा कंटेंट नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
TikTok वर बंदी लागल्यास लाखो वापरकर्ते नवीन पर्याय शोधतील. Instagram Reels हे त्या वापरकर्त्यांसाठी उत्तम प्लॅटफॉर्म ठरू शकते. त्यामुळे Instagram आता छोट्या व्हिडिओ कंटेंटसाठी प्राधान्य दिले जाणारे प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने काम करत आहे.
अमेरिकेत सध्या या फीचर्सची चाचणी सुरू असून यशस्वी झाल्यास ते जागतिक स्तरावर उपलब्ध केले जातील. Instagram चा हा निर्णय त्याच्या व्यासपीठाला अधिक प्रबळ बनवेल, तसेच TikTok वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरेल.
TikTok वर बंदी लागू होण्याच्या शक्यतेने सोशल मीडिया क्षेत्रात मोठे बदल होताना दिसत आहेत, आणि Instagram ने या संधीचे सोने करण्याचा निर्धार केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.