Instagram Threads eSakal
विज्ञान-तंत्र

Instagram Threads : मस्कचं टेन्शन वाढलं! १०० हून अधिक देशांमध्ये इन्स्टाग्रामचं थ्रेड्स अ‍ॅप लाँच; पाहा काय आहे खास

थ्रेड्स अ‍ॅपचा थेट फटका ट्विटरला बसणार आहे.

Sudesh

मेटा कंपनीच्या इन्स्टाग्रामने आपलं एक नवीन अ‍ॅप लाँच केलं आहे. हे एक टेक्स्ट बेस्ड कनव्हर्सेशन अ‍ॅप आहे. 'थ्रेड्स' नाव असलेलं हे अ‍ॅप थेट ट्विटरला टक्कर देणार आहे. त्यामुळे इलॉन मस्कचं टेन्शन वाढलं आहे.

इन्स्टाग्राम हे मुख्यत्वे फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगसाठीचं अ‍ॅप आहे. तर, थ्रेड्स हे शब्दांच्या माध्यमातून विचार शेअर करण्यासाठीचे अ‍ॅप असणार आहे. अशी माहिती मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अ‍ॅप लाँच करताना दिली. (Instagram Threads App)

दोन्ही प्लॅटफॉर्मवर लाँच

थ्रेड्स हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि अ‍ॅपल अशा दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी लाँच करण्यात आलं आहे. १००हून अधिक देशांमध्ये हे अ‍ॅप लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. गुगलच्या प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुन हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकता.

इन्स्टाग्राम अकाउंट अनिवार्य

हे अ‍ॅप इन्स्टाग्रामने लाँच केलं असल्यामुळे, याचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे इन्स्टाग्राम अकाउंट असणं अनिवार्य आहे. तुम्ही आपलं इन्स्टाग्रामचं यूजरनेम थ्रेड्सवर देखील वापरू शकाल.

आधीच मिळाली होती हिंट

इन्स्टाग्राम ट्विटरला टक्कर देणारं हे अ‍ॅप लाँच करणार आहे याबाबत आधीच हिंट मिळाली होती. इन्स्टाग्राम एक टेक्स्ट बेस्ड अ‍ॅप तयार करत आहे अशी चर्चा मार्चमध्येच माध्यमांमध्ये सुरू होती. यावेळी P92 या कोडनेम अंतर्गत या अ‍ॅपवर काम सुरू होतं.

ट्विटरचं टेन्शन वाढलं

थ्रेड्स अ‍ॅपचा थेट फटका ट्विटरला बसणार आहे. इलॉन मस्कने विकत घेतल्यानंतर ट्विटर अ‍ॅपमध्ये बरेच बदल झाले आहेत. तसेच, यूजर्सवर देखील मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू केले जात आहेत. यामुळे, कित्येक ट्विटर यूजर्स एक नवीन पर्याय शोधत असतानाच इन्स्टाग्रामने हे अ‍ॅप लाँच करून संधी साधली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: बिबट्यांची नसबंदी करणार; अजित पवार यांची माहिती, केंद्र सरकारकडे पाठविणार प्रस्ताव

चंद्रकांत कुलकर्णी लिखित 'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय' आता व्यवसायिक रंगभूमीवर; दिसणार हे कलाकार

Agricultural News : कांदा, मका, सोयाबीन... नाशिकच्या शेतकऱ्यांनी ऊस, द्राक्ष का सोडले?

Indore Transgender Poisoning : एकाच वेळी २४ तृतीयपंथीयांनी केले विष प्राशन; तपासात धक्कादायक कारण समोर

Uttar Pradesh news: एक अनोखे गाव जिथे ३७ वर्षांपासून पोलिस ठाण्यात एकही तक्रार नाही; प्रेम आणि एकजुटीसाठी युपीमध्ये ठरत आहे आदर्श

SCROLL FOR NEXT