instagram features  esakal
विज्ञान-तंत्र

Instagram : इन्स्टाग्रामवर येणार नवं फिचर; पैसे मिळवण्यास होणार मदत

मेटा आपल्या सोशल मीडिया अॅपवर पैसे कमविण्यासाठी वापरकर्त्यांना अनेक फिचर्स देत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मेटा आपल्या सोशल मीडिया अॅपवर पैसे कमविण्यासाठी वापरकर्त्यांना अनेक फिचर्स देत आहे. कारण इन्स्टाग्राम (Instagram) चायनीज अॅप टिकटॉकशी (Tiktok) स्पर्धा करत आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अॅपवर वापरकर्ते जाहिरातीद्वारे पैसे कमवत आहेत.

मेटा ने बुधवारी सांगितले की ते इन्स्टाग्राम मध्ये ट्रेड डिजिटल कलेक्टिबल्स टूलसह अनेक नवीन फिचर्स येणार आहेत. यामुळे वापरकर्त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पैसे कमविण्यास मदत होणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, वापरकर्ते लवकरच त्यांचे नॉन-फंगीबल टोकन (NFTs) खरेदी करून थेट इन्स्टाग्राम  (Instagram) वरून थेट पैसे कमवू शकतील. कंपनी लवकरच नवीन फीचर्सची चाचणी सुरू करणार आहे. मेटा कंपनीच्या मते, नवीन वैशिष्ट्यांची चाचणी युनायटेड स्टेट्समधील वापरकर्त्यांच्या लहान ग्रुपमध्ये केली जाईल आणि लवकरच इतर देशांमध्ये हे फिचर्स आणले जाईल.

हेही वाचा: राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

वापरकर्ते अधिक पैसे कमवू शकतील

मेटा (Meta) ने सांगितले की, ते युनायटेड स्टेट्समधील सर्व वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम  (Instagram) नवीन फिचर्समध्ये प्रवेश देत आहे. जेणेकरून ते फोटो-शेअरिंग अॅपवर अधिक पैसे कमवू शकतील. याशिवाय कंपनी इन्स्टाग्रामवर वापरकर्त्यांना भेटवस्तूही देत ​​आहे. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना त्यांच्या चाहत्यांकडून पैसे कमविण्याचा एक नवीन मार्ग मिळाला आहे.

व्यावसायिक मोड मिळवू शकता

कंपनी फेसबुक प्रोफाईलसाठी एक प्रोफेशनल मोड देखील लाँच करत आहे,  त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या वैयक्तिक फेसबुक प्रोफाइलसह सार्वजनिकरित्या त्याचा फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT