Threads by Instagram eSakal
विज्ञान-तंत्र

Threads by Instagram : थ्रेड्स अ‍ॅप नव्हे ट्रॅप? यूजर्सना करता येईना डिलीट; लवकरच येणार अपडेट

थ्रेड्स अ‍ॅपमध्ये लॉग-इन करण्यासाठी इन्स्टाग्राम अकाउंट गरजेचं आहे.

Sudesh

Meta Threads App : इन्स्टाग्रामने दोन दिवसांपूर्वी आपलं थ्रेड्स हे अ‍ॅप लाँच केलं होतं. ट्विटरला टक्कर देण्यासाठी म्हणून लाँच केलेल्या या अ‍ॅपला एका दिवसातच कोट्यवधी लोकांनी डाऊनलोड केलं. मात्र, यानंतर यूजर्सना एक मोठी गोष्ट समजली.

डिलीट होत नाही अ‍ॅप

थ्रेड्स अ‍ॅपमध्ये लॉग-इन करण्यासाठी इन्स्टाग्राम अकाउंट गरजेचं आहे. इन्स्टाग्रामचे क्रेडेन्शिअल्स वापरूनच थ्रेड्स लॉग-इन होतं. मात्र, जर तुम्ही थ्रेड्स अकाउंट डिलीट करण्याचा प्रयत्न केला तर त्यासोबत तुमचं इन्स्टाग्रामही डिलीट होतं. म्हणजेच, केवळ थ्रेड्स अ‍ॅप डिलीट करण्याची सोयच यामध्ये करण्यात आलेली नाही.

लवकरच येणार अपडेट

याबाबत लाखो यूजर्सनी तक्रार केल्यानंतर अखेर इन्स्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. लवकरच आम्ही थ्रेड्स अकाउंट स्वतंत्रपणे डिलीट करण्याचा पर्याय देणार आहोत. हे अ‍ॅप इन्स्टाग्रामने तयार केलं असल्यामुळे, दोन्ही अ‍ॅपवरील अकाउंट लिंक आहेत. मात्र, हे वेगळे करण्याबाबत काम सुरू असून, लवकरच याचा अपडेट देण्यात येईल असं मोसेरी म्हणाले.

डिअ‍ॅक्टिव्हेट करता येईल

थ्रेड्सचं अकाउंट तुम्ही डिलीट करू शकत नसला, तरी ते डिअ‍ॅक्टिव्हेट करण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी प्रोफाईलवर जायचं आहे. त्यानंतर सेटिंग्स या पर्यायात जाऊन आपलं अकाउंट निवडायचं आहे.

यानंतर 'डिअ‍ॅक्टिव्हेट प्रोफाईल'वर क्लिक करा. पुढे डिअ‍ॅक्टिव्हेट थ्रेड्स प्रोफाईल या पर्यायावर टॅप केल्यास तुमचं थ्रेड्स अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट होईल. यानंतर पुन्हा लॉग-इन केल्यानंतर तुमचं अकाउंट परत सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT