Instagram Threads eSakal
विज्ञान-तंत्र

Instagram Threads : घ्या! आता ट्विटरप्रमाणे थ्रेड्सवर देखील लागू होणार निर्बंध; मस्कने दिली भन्नाट प्रतिक्रिया

ट्विटरवर सध्या दिवसाला किती ट्विट पाहता येतील यावर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.

Sudesh

इन्स्टाग्रामने काही दिवसांपूर्वी ट्विटरला टक्कर म्हणून थ्रेड्स हे अ‍ॅप लाँच केलं होतं. ट्विटरवर लागू असलेल्या निर्बंधांमुळे कंटाळलेले यूजर्स या अ‍ॅपला भरपूर पसंत देत आहेत. मात्र, आता थ्रेड्सवर देखील निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचा विचार सुरू असल्याचं समोर आलं आहे.

ट्विटरवर एका दिवसाला किती ट्विट पाहता येतील याचं ठराविक लिमिट लागू करण्यात आलं आहे. अशा प्रकारची कोणतीही अट थ्रेड्स अ‍ॅपवर सध्या नाहीये. मात्र, लवकरच अशा प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येतील असं इन्स्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी यांनी एका थ्रेड्स पोस्टमध्ये सांगितलं.

ट्विटरवर निर्बंध

ट्विटरवर सध्या व्हेरिफाईड लोक दिवसाला १० हजार ट्विट पाहू शकतात, तर अनव्हेरिफाईड यूजर्स १,००० ट्विट पाहू शकतात. नवीन जॉईन झालेले अनव्हेरिफाईड यूजर्स दिवसाला केवळ ५०० ट्विट पाहू शकतात. एका दिवसाची लिमीट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही नवीन ट्विट पाहू शकत नाही. आता अशाच प्रकारचे निर्बंध थ्रेड्सवर देखील लागू होऊ शकतात.

काय आहे कारण?

प्लॅटफॉर्मवर वाढत चाललेल्या स्पॅम हल्ल्यांमुळे हे पाऊल उचलणार असल्याचं मोसेरी म्हणाले. या हल्ल्यांमुळे अ‍ॅक्टिव्ह यूजर्सची संख्या कमी होत आहे. जर स्पॅम अटॅकमुळे कुणाला अडचण येत असेल तर कृपया आम्हाला कळवा, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

मस्कची प्रतिक्रिया

मोसेरी यांच्या या पोस्टवर इलॉन मस्कने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. यावर हसत त्याने थ्रेड्सला 'कॉपीकॅट' म्हटलं. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी यापूर्वी थ्रेड्स हे पूर्ण अ‍ॅपच ट्विटरची कॉपी असल्याचा आरोप केला आहे. स्पर्धा ठीक आहे, मात्र चीटिंग आजिबात योग्य नसल्याचं म्हणत त्यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील सुरू केली आहे.

यापूर्वीही केली कॉपी

यापूर्वीही मेटाने ट्विटरची कॉपी केली आहे. ट्विटरने सबस्क्रिप्शन-आधारित ब्लू-टिक सेवा सुरू केल्यानंतर काही दिवसांमध्येच मेटाने आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम या अ‍ॅप्सवर देखील ब्लू-टिक साठी सबस्क्रिप्शन सुरू केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT