Instagram Reels Update eSakal
विज्ञान-तंत्र

Insta Update : इन्स्टाग्रामवर रील्स बनवणाऱ्यांसाठी खुशखबर! अ‍ॅपमध्ये मिळणार मोठं अपडेट; यूजर्सना होणार फायदा

Instagram Reels : मेटा कंपनी इन्स्टावरील क्रिएटर्ससाठी एक नवीन फीचर आणणार आहे.

Sudesh

इन्स्टाग्राम हे सगळ्यात लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅपपैकी एक आहे. यावर असणारं रील्स फीचर हे यूजर्सना विशेष आवडतं. कित्येक यूजर्स स्वतःही रील्स बनवत असतात; तर कित्येक इन्फ्लुएन्सर्स या माध्यमातून तगडी कमाई देखील करतात. तुम्हालाही इन्स्टावर रील्स बनवणं आवडत असेल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.

मेटा कंपनी इन्स्टावरील क्रिएटर्ससाठी एक नवीन फीचर आणणार आहे. यामुळे रील्सची वेळ ही 3 मिनिटांवरून तब्बल 10 मिनिटं होणार आहे. टेक क्रंच वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. कंपनी सध्या या अपटेडची चाचणी करत असून, लवकरच हे अपडेट लाँच केलं जाईल असं मेटाने म्हटलं आहे.

सध्या केवळ 3 मिनिटे वेळ

सध्या इन्स्टाग्रामवर केवळ तीन मिनिट लांबीचे व्हिडिओ पोस्ट करता येतात. यामुळे कित्येक क्रिएटर्सना आपले व्हिडिओ अधिक सविस्तर बनवता येत नाहीत. 10 मिनिटांपर्यंत हा वेळ वाढवल्यास इन्फ्लुएन्सर्स अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतील.

याचा फायदा एज्युकेशनल व्हिडिओ, टिप्स आणि हॅक्स सांगणारे व्हिडिओ किंवा कुकिंगबाबतचे व्हिडिओ अशा प्रकारचा कंटेंट तयार करणाऱ्यांना होणार आहे. सोबतच इतर यूजर्सनाही हे अपडेट फायद्याचं ठरेल. या फीचरची चाचणी सुरू असून, ते कधी लाँच होईल याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, टिकटॉक या सोशल मीडिया अ‍ॅपवर देखील 10 मिनिटांचे व्हिडिओ पोस्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, हे अ‍ॅप चिनी कंपनी बाईटडान्सच्या मालकीचं असल्यामुळे भारतात यावर बंदी लागू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT