instagram users report outage accounts getting suspended instagram followers reduced  Sakal
विज्ञान-तंत्र

Instagram Outage: इंस्टाग्राम युजर्ससाठी मोठी बातमी! अचानक अकाउंट होतायेत सस्पेंड

सकाळ डिजिटल टीम

instagram outage : सर्व सोशल मीडिया साइट्स इंस्टाग्राम वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, यादरम्यान अचानक त्यांचे खाते सस्पेंड केले जात असल्याचा इशारा देण्यात आला आहे. युजर्स सोशल मीडियावर या अलर्टचा फोटोही शेअर करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही युजर्सना दुपारी 1 वाजता हा इशारा मिळू लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, युजर्सना अलर्टसह सांगण्यात आले होते की त्यांच्याकडे 30 दिवस आहेत, त्यानंतर त्यांचे खाते सस्पेंड केले जाईल. हा इशारा हजारो वापरकर्त्यांना देण्यात आला आहे. कम्युनिटी गाइडलाईन्सचे पालन न केल्यामुळे ही कारवाई केली जात असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान यानंतर इंस्टाग्राम युजर्समध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आणि त्यांनी हा राग त्यांच्या ट्विटर अकाउंटवर काढला जात आहे, एक-दोन नव्हे तर हजारो यूजर्स आपला राग काढत आहेत. काही काळापूर्वी व्हॉट्सअॅप दोन तास बंद पडल्यानंतरही युजर्समध्ये प्रचंड संताप व्यक्त केला होता आणि काही दिवसांनंतर आता इन्स्टाग्राममध्ये एवढी मोठी समस्या निर्माण झाल्यानंतर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

काही युजर्सना अशी समस्या देखील दिसली की अकाऊंटमध्ये कोणतीही अ‍ॅक्टिव्हिटी होत नाही आणि त्यांचे अकाउंट एक प्रकारे फ्रीज झाले होते, ज्यामुळे यूजर्स काळजीत पडल्याचे पाहायला मिळाले. जी काही वॉर्निंग देण्यात आली आहे, त्यात असं म्हटलं जात आहे की, कम्युनिटी गाइडलाइन्समुळे तुमचे खाते सस्पेंड केले जात आहे. दरम्यान इंस्टाग्राम वापरकर्ते इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्क्रीनशॉट देखील शेअर करत आहेत. तसेच अनेक युजर्सचे म्हणणे आहे की डाऊनसोबतच त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही कमी होत आहे. 

आम्हाला माहिती आहे की तुमच्यापैकी काहींना तुमच्या Instagram खात्यात वापरण्यात अडचणी येत आहेत. आम्ही ते पाहत आहोत आणि गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत, असे इंस्टाग्रामने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

SCROLL FOR NEXT