iPhone 13 sakal
विज्ञान-तंत्र

थोडं थांबा! iPhone14 लॉन्च होताच, iPhone 13 होणार २० हजारांनी स्वस्त

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली – आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कारण आयफोन सिरीजचा iPhone 14 उद्या लॉन्च होणार आहे. जर तुम्हाला नवीन आयफोन सीरिजवर जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर यावेळी तुम्ही आयफोन 13 ला परवडणाऱ्या किमतीत खरेदी करू शकता. यावेळी आयफोन 13 मोबाईल मोठं डिस्काउंट मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

फ्लिपकार्ट आणि आणि अ‍ॅमेझॉनवरील आगामी सेलदरम्यान iPhone 13 ची किंमत 50,000 रुपयांपेक्षा कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ई-कॉमर्स मधील दिग्गज असलेली फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन कंपनी या महिन्याच्या अखेरीस त्यांचा मेगा फेस्टिव्ह सेल आयोजित करण्याची तयारी करत आहेत. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे, तेव्हाच Amazon देखील आपला सेल सुरू करणार आहे.

सर्वांची नजर आयफोन 13 वर आहे कारण ई-कॉमर्स साइट आयफोन 13 वर बंपर सूट देऊ शकतात. टिपस्टर अभिषेक यादवच्या मते, फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनच्या विक्रीदरम्यान, iPhone 13 ची किंमत 53,000 रुपयांपर्यंत कमी केली जाईल. या कालावधीत ई-कॉमर्स साइट्समध्ये बँक ऑफर तसेच एक्सचेंज ऑफरचा समावेश असेल. त्यामुळे, सर्व ऑफर एकत्र घेतल्यास, सेल दरम्यान आयफोनची किंमत 49,000 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.

दरम्यान अद्याप Amazon किंवा Flipkart कडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आता अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट आयफोनवर भरघोस सूट देणार की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सेल सुरू होण्याची वाट पाहावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Meeting News: दिवाळीआधी पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; फडणवीस सरकारने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय

'सीता और गीता' साठी हेमामालिनी नाही तर 'या' अभिनेत्रीला झालेली विचारणा; नकार दिल्याचा आजही होतोय पश्चाताप

Fastag : भावाने फास्टॅगला खरं लुटलं! 13 राज्ये फिरून आला अन् वाचवले इतके रुपये, टोल प्लाझावाले बघतच राहिले, तुम्हीपण वापरू शकता ही ट्रिक

Education News : टीईटी परीक्षा बनली 'कमाईचा स्रोत'; शुल्कवाढीमुळे सरकारने ₹५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला!

Pimpri Metro: मेट्रोचा पादचारी पूल अद्याप अपूर्णच; मोरवाडी चौकात संथगतीने काम, धोका पत्करून रस्ता ओलांडण्याची वेळ

SCROLL FOR NEXT