iPhone 14 Price Drop eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone 14 Price Drop : 'आयफोन-15' लाँच होताच स्वस्त झाला 'आयफोन-14'; पाहा किती रुपयांना मिळतोय?

Apple iPhone 15 Launch : अ‍ॅपलने नुकताच आपला नवीन आयफोन-15 लाँच केला आहे.

Sudesh

अ‍ॅपलने मंगळवारी (12 सप्टेंबर) आपला बहुप्रतिक्षित आयफोन-15 लाँँच केला. वाँडरलस्ट इव्हेंटमध्ये कंपनीने नव्या आयफोनचे चार मॉडेल्स लाँच केले. यानंतर आयफोन-14 च्या किंमतीमध्ये मात्र मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे.

नवीन आयफोन लाँच झाल्यानंतर जुन्याच्या किंमती कमी होणे ही नवीन गोष्ट नाही. आयफोन-15 च्या घोषणेनंतरच iPhone 13 च्या किंमतीमध्ये घट दिसून येत होती. आता iPhone 15 लाँच झाल्यामुळे iPhone 14 च्या किंमतीत तब्बल 13 हजारांपर्यंतची घट झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही बँक ऑफरशिवाय असणारा हा फ्लॅट डिस्काउंट आहे.

13 हजारांचा फ्लॅट डिस्काउंट

गेल्या वर्षी आयफोन-14 भारतात लाँच झाला होता. यावेळी त्याची किंमत ही 79,900 रुपये एवढी होती. ही किंमत 128GB बेस व्हेरियंटची होती. आता फ्लिपकार्टवर हा फोन चक्क 66,999 रुपयांना मिळत आहे. म्हणजेच, ओरिजिनल किंमतीपेक्षा तब्बल 12,991 रुपयांची सूट यावर मिळत आहे.

बँक ऑफर्सही उपलब्ध

विविध साईट्सवर आयफोन-14 घेण्यासाठी बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. यामध्ये ग्राहकांना 4 हजारांपर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो. सोबतच, एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून तब्बल 30 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

कसा आहे आयफोन-14?

iPhone 14 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. यातील प्रायमरी आणि सेल्फी कॅमेरे 12 मेगापिक्सलचे आहेत. यात A15 बायोनिक चिपसेट देण्यात आलेला आहे. तसेच याचा डिस्प्ले 6.1 इंच एवढा मोठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT