Flipkart Big Billion Days Sale iPhone 15 Smartphone Discount Offer esakal
विज्ञान-तंत्र

iPhone 15 Discount : फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजमध्ये धमाकेदार डील; iPhone 15 मिळतोय 55 हजारांपेक्षा कमी किंमतीत

Big Billion Days iPhone 15 Discount Offer : फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजमध्ये आयफोन 15 ची धमाकेदार डील सुरु झाली आहे. आता तुम्ही हा जबरदस्त स्मार्टफोन फक्त 55,999 रुपायांमध्ये घरी घेऊ शकता.

Saisimran Ghashi

Flipkart Sale iPhone Smartphone Discount Offer : फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे! आकर्षक डिस्काउंटसह iPhone 15 फक्त 55,999 रुपायांमध्ये मिळवण्याची संधी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.iPhone 15 ची मूळ किंमत 69,900 रुपये आहे, पण बिग बिलियन डेजच्या ऑफरमध्ये ती फक्त 55,999 रुपायांमध्ये मिळत आहे. यावरूनच तुम्ही किती मोठी बचत करू शकता हे लक्षात येईल.

फ्लिपकार्टवर सध्या आयफोन 15 ची किंमत 55,999 रुपये आहे. पण तुम्ही एचडीएफसी बँकेच्या कार्डचा वापर केल्यास अतिरिक्त 1,500 रुपयेची बचत करू शकता. फ्लिपकार्ट अॅक्सिस क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास तर तुम्हाला तब्बल 1,900 रुपये इतका डिस्काउंट मिळतो. म्हणजेच, फोनची किंमत प्रभावीपणे 54,099 रुपये इतकी होते. त्यासोबतच, जुना आयफोन 11 सारखा फोन एक्सचेंज केल्यास किंमत आणखी कमी करता येऊ शकते, अगदी 37,000 रुपये इतका डिस्काउंट मिळेल. मोठा डिस्प्ले आवडणाऱ्यांसाठी आयफोन 15 प्लस उपलब्ध आहे. त्याची डिस्काउंटेड किंमत 59,999 रुपये आहे.

आयफोन 15 फीचर्स

डिस्प्ले आणि डिझाईन: आयफोन 15 मध्ये 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे तर 15 प्लस मध्ये 6.7 इंच मोठा डिस्प्ले आहे. दोन्ही फोन पिंक, यलो, ग्रीन, ब्लू आणि ब्लॅक या 5 आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. 1600 निट्स पर्यंतची पीक एचडीआर ब्राइटनेस आहे. डिझाईनबाबत, आयफोन 14 सारखीच आहे, पण यामध्ये गेल्या वर्षी आलेल्या आयफोन 14 प्रोमध्ये आलेला लोकप्रिय डायनामिक आयलॅंड नॉच आहे.

कॅमेरा: आयफोन 15 सीरीजमध्ये कॅमेराची मोठी झेप आहे. आता दोन्ही फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे, जो आयफोन 14 सीरीजमधील 12 मेगापिक्सल पेक्षा बराच चांगला आहे. म्हणजेच, खासकरुन कमी प्रकाशाच्या वातावरणात आणि पोर्ट्रेट फोटोंमध्ये चांगल्या क्वालिटीचे फोटो काढता येणार आहेत. नवीन 2x टेलिफोटो फीचर आहे, आणि आता पोर्ट्रेट मोडमध्ये फोटो काढल्यानंतर फोकसही बदलता येतो.

बॅटरी आणि चार्जिंग: ऍपलच्या दाव्यानुसार आयफोन 15 आणि 15 प्लस दोन्ही फोनमध्ये "ऑल-डे बॅटरी लाईफ" आहे. USB टाईप-C चार्जिंग पोर्ट हा मोठा बदल आहे. आता एअरपॉड्स किंवा ऍपल वॉच सारख्या इतर डिव्हाइससाठीही तुम्ही हीच केबल वापरु शकता.

या सर्व वैशिष्ट्यांसह आणि डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर iPhone 15 ही खरेदी करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. जर तुम्हाला कमी किंमतीत आयफोन घ्यायचा असेल तुमचे तेवढे बजेट असेल तर नक्कीच या डिलचा फायदा घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT