iPhone 15 Pro Discount Flipkart Big Shopping Utsav  esakal
विज्ञान-तंत्र

iPhone 15 Pro Discount : खुशखबर! iPhone 15 Pro खरेदीवर मिळतोय चक्क 41 हजारांचा बंपर डिस्काउंट, कुठं सुरुयं ऑफर? लगेच बघा

iPhone 15 Pro Discount Big Shopping Utsav : सणासुदीच्या 'Big Shopping Utsav' मध्ये iPhone 15 Pro वर 41,600 रुपयांची घसघशीत सवलत मिळत आहे.

Saisimran Ghashi

iPhone 15 Pro Discount Offer : स्मार्टफोन खरेदीदारांसाठी फ्लिपकार्टच्या 'Big Shopping Utsav' मध्ये iPhone 15 Pro वर मोठी सवलत देण्यात आली आहे. 256GB वेरिएंटवर 41,600 रुपयांची सूट मिळत असून, याशिवाय एक्स्चेंज ऑफर आणि बँक ऑफर्सचा फायदा देखील खरेदीदार घेऊ शकतात. सेलमध्ये Apple, Samsung, Motorola, Vivo यांसारख्या प्रमुख ब्रँडचे स्मार्टफोन स्वस्तात उपलब्ध आहेत.

हा सेल 9 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाला असून, 13 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. अ‍ॅक्सिस बँक, BOBCARD, RBL बँक, आणि Yes बँक कार्ड वापरकर्त्यांना 10 टक्क्यांची तात्काळ सवलत मिळेल. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना अतिरिक्त 5 टक्के कॅशबॅकचा लाभ मिळेल. तसेच, नो-कॉस्ट EMI आणि फ्लिपकार्ट पे लेटरच्या माध्यमातून 1 लाख रुपयांपर्यंतचे क्रेडिट फायदेही उपलब्ध आहेत.

iPhone 15 Pro च्या 256GB वेरिएंटची मूळ किंमत 1,44,900 रुपये होती, मात्र आता हा फोन 1,15,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास 7,750 रुपयांची अतिरिक्त सवलत मिळून फोनची किंमत 1,08,249 रुपयांवर येईल. याशिवाय, जुन्या फोनच्या एक्स्चेंज ऑफरमध्ये 5,000 रुपयांची आणखी सूट मिळू शकते.

उदाहरणार्थ, Google Pixel 7a फोन एक्स्चेंज करून iPhone 15 Pro खरेदी केल्यास, हा फोन फक्त 88,099 रुपयांमध्ये मिळू शकतो.

iPhone 15 Pro च्या बॅटरीची क्षमता उत्तम असून, कॅमेरा फिचर्स देखील प्रभावी आहेत. A17 Pro चिपसेटवर आधारित हा फोन गेमिंगसाठी उत्कृष्ट परफॉर्मन्स देतो.

Apple ने iPhone 15 Pro चे उत्पादन थांबवले आहे, मात्र सध्या काही स्टॉक्स उपलब्ध आहेत. त्यामुळे या सवलतीचा फायदा घेऊन iPhone 15 Pro खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT