iPhone 15 Price in Pakistan eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone 15 in Pakistan : पाकिस्तानात किती रुपयांना मिळतोय आयफोन? एवढ्यात तर येईल टाटाची 'ही' कार

Pakistan iPhone Price : तुम्हाला भारतातील आयफोनची किंमत जास्त वाटत असेल, तर पाकिस्तानातील किंमत ऐकून तुमच्या भुवया उंचावतील.

Sudesh

अ‍ॅपलने काही दिवसांपूर्वीच आपली नवीन आयफोन-15 सीरीज लाँच केली होती. याची अधिकृत विक्री देखील सुरू झाली आहे. अपेक्षेप्रमाणे आयफोन-14 सीरीजच्या तुलनेत नवे फोन महाग आहेत. भारतात तर iPhone 15 Pro Max या मॉडेलच्या टॉप व्हेरियंटची किंमत दोन लाखांपर्यंत जात आहे.

दरम्यान, पाकिस्तानात देखील आयफोनची ही नवीन सीरीज लाँच झाली आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील आयफोनच्या किंमतीत जमीन-आस्मानाचा फरक आहे. तुम्हाला भारतातील आयफोनची किंमत जास्त वाटत असेल, तर पाकिस्तानातील किंमत ऐकून तुमच्या भुवया उंचावतील.

एवढ्यात येईल कार

पाकिस्तानात iPhone 15 Pro Max मॉडेलच्या बेस व्हेरियंटची किंमत 7.5 लाख रुपये आहे. त्यातच जर मोठं स्टोरेज असणारं व्हेरियंट घ्यायचं असेल, तर त्याची किंमत 9 लाख रुपयांपर्यंत जाते. एवढ्या किंमतीमध्ये तर भारतात एक कार येऊ शकेल. टाटा पंच, ह्युंडाई एक्स्टर अशा कित्येक मिनी एसयूव्ही या किंमतीत तुम्हाला मिळू शकतील.

कशामुळे एवढी किंमत?

पाकिस्तानची अर्थव्यवस्था गेल्या कित्येक महिन्यांपासून डबघाईला आली आहे. यामुळे सरकारने कित्येक प्रकारचे कर लागू केले आहेत. PTA टॅक्स, इम्पोर्ट ड्यूटी आणि टॅक्स या सर्व गोष्टी मिळून iPhone 15 प्रो मॅक्सच्या टॉप व्हेरियंटची किंमत 9 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT