Apple iPhone 17 design leaks : सप्टेंबर 2025 मध्ये अपेक्षित असलेल्या Apple iPhone 17 मालिकेच्या लॉन्चपूर्वीच त्याच्या डिझाइनच्या लिक्सनी तंत्रज्ञानप्रेमींच्या उत्सुकतेला उधाण आले आहे. विशेषतः ‘वायझर-स्टाइल कॅमेरा मॉड्यूल’ या अफवांमुळे हा फोन स्मार्टफोन डिझाइनमध्ये क्रांती घडवू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही वर्षांत Apple ने iPhone मॉडेल्सच्या हार्डवेअर डिझाइनमध्ये फारसे बदल केले नव्हते. अगदी iPhone 16 मालिकाही त्याच पारंपरिक डिझाइनला चिकटून राहिली होती. मात्र, iPhone 17 सिरीजमध्ये मोठा बदल दिसण्याची शक्यता आहे. यामुळे Apple चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा वाढल्या आहेत.
प्रसिद्ध टिपस्टर Majin Bu यांच्या लीक नुसार, iPhone 17 मध्ये वायझर-स्टाइल कॅमेरा मॉड्यूल दिसण्याची शक्यता आहे. पिल-आकाराचे कॅमेरा युनिट फोनच्या मागील बाजूस वरच्या भागात दिसते. या डिझाइनमध्ये एक मोठा कॅमेरा कटआउट डाव्या बाजूला दिसतो, जो iPhone च्या पारंपरिक डिझाइनपेक्षा खूप वेगळा आहे.
या नवीन डिझाइनची तुलना Google Pixel स्मार्टफोन्सच्या वायझर-स्टाइल कॅमेरा मॉड्यूलशी केली जात आहे. iPhone 16 सिरीजच्या बेस व्हेरिएंटमध्ये उभ्या रचनेत कॅमेरे दिसले होते, तर Pro आणि Max मॉडेल्समध्ये पारंपरिक डिझाइन ठेवण्यात आले होते. मात्र, iPhone 17 मालिकेत या डिझाइनमध्ये मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे स्मार्टफोन डिझाइनच्या जगात नवीन ट्रेंड सेट होऊ शकतो.
iPhone 17 मालिकेच्या कॅमेरा मॉड्यूलबाबत झालेल्या लीकमुळे, हा फोन फक्त डिझाइनच्या बाबतीतच नाही तर इतर क्षेत्रातही नवीन ट्रेंड निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे. Apple नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी ओळखला जातो. यामुळे, iPhone 17 मालिका नव्या फीचर्स आणि डिझाइनमुळे 2025 मधील सर्वाधिक चर्चेत राहणारा स्मार्टफोन ठरणार, यात शंका नाही.
जर वायझर-स्टाइल कॅमेरा मॉड्यूलची अफवा खरी ठरली, तर iPhone 17 मालिका स्मार्टफोन डिझाइनच्या क्षेत्रात क्रांती घडवेल. यामुळे केवळ तंत्रज्ञानप्रेमीच नव्हे, तर डिझाइनप्रेमीही या नव्या आयफोनसाठी प्रतीक्षा करताना दिसतील.
Apple iPhone 17 मालिका स्मार्टफोन जगताला नवीन दिशा देणार का? याचा उलगडा 2025 च्या सप्टेंबरमध्ये होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.