Fact Check eSakal
विज्ञान-तंत्र

Fact Check : भारतीय पोस्ट ऑफिसची 'लकी ड्रॉ' ऑफर, मोफत मिळतोय आयफोन 15? काय आहे सत्य?

India Post : सोशल मीडियावर हा मेसेज सध्या व्हायरल होत आहे.

Sudesh

सध्या फेस्टिव्ह सीझन सुरू असल्यामुळे कित्येक लोक नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करत आहेत. तसंच सणासुदीमुळे कित्येक कंपन्या ऑनलाईन सेलही आयोजित करत आहेत. त्यामुळे महागडे मोबाईल अगदी स्वस्तात उपलब्ध होत आहेत.

अ‍ॅपलने काही दिवसांपूर्वीच आपली नवीन आयफोन 15 सीरीज लाँच केली आहे. डिस्काउंट ऑफर्समध्ये कमी किंमतीत आयफोन घेण्यासाठी कित्येक जण उत्सुक आहेत. अशातच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या मेसेजमध्ये असं म्हटलं आहे, की भारतीय पोस्ट मोफत आयफोन 15 देत आहे.

भारतीय पोस्ट ऑफिसने नवरात्रीच्या निमित्तीने एक लकी ड्रॉ आयोजित केली आहे. यामध्ये विजेत्या स्पर्धकाला iPhone 15 दिला जाईल. यासाठी हाच मेसेज 5 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये तसंच 20 लोकांना शेअर करावा लागेल असं एका व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं जात आहे.

हा मेसेज पूर्णपणे चुकीचा असून, अशा प्रकारचा कोणताही लकी ड्रॉ घोषित केला नसल्याचं इंडिया पोस्टने एक्स पोस्ट करत स्पष्ट केलं आहे. हा एक प्रकारचा स्कॅम असून, लोकांनी याला बळी पडू नये. तसंच अशा प्रकारचा कोणताही मेसेज पुढे फॉरवर्ड करू नये असं आवाहन देखील पोस्ट विभागाने केलं आहे.

इंडिया पोस्टने आपल्या ट्विटमध्ये या मेसेजचा स्क्रीनशॉट देखील दिला आहे. तसंच, अशा प्रकारची कोणतीही लकी ड्रॉ स्पर्धा पोस्ट विभाग घेत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मोफत आयफोन देणाऱ्या किंवा तत्सम आमिष असणाऱ्या लिंकवर क्लिक करू नये असं आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT