विज्ञान-तंत्र

लॅपटॉप स्लो झाला? चिंता नको, क्रोम ब्राउझरने आणले नवीन फीचर

नीलेश डाखोरे

नागपूर : आजचा जमाना हा सोशल मीडियाचा (Social media) आहे. प्रत्येकाकडे मोबाईल पाहायला मिळतो. तसेच संगणक व लॅपटॉप वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गरजेनुसार याचा वापर होत असतो. कामानिमित्त क्रोममध्ये एकाचवेळी बरेच टॅब (Lots of tabs at once in Chrome) उघडणाऱ्यांची कमतरता नाही. असं करणे केवळ अडचणींना कारणीभूत ठरत नाही, तर यामुळे डिव्हाइसच्या रॅमवरील ओझे देखील वाढत (Computer and laptop slowed down) असते. आता जुने टॅब आपोआप बंद होणार आहे. त्यामुळे ही महत्त्वाची बातमी आहे. (Is-your-laptop-slow?-New-features-introduced-by-Chrome-browser)

क्रोम ब्राउझर जगभरातील सुमारे ६४ टक्के लोक वापरतात. अनेकांना एकाचवेळी अनेक टॅब ओपन करण्याची सवय असते. कामाच्या व्यापानुसार ते असे करीत असतात. मात्र, यामुळे डिव्हाइसच्या रॅमवरील ताण वाढतो. यामुळे लॅपटॉप किंवा संगणक हॅंग होऊन त्याची गती कमी होते. मात्र, याकडे कोणाचेच लक्ष जात नाही. अशावेळी चिडचिड वाढते.

संगणक किंवा लॅपटॉप खराब झाला असा विचार मनात येतो. अशावेळी सर्व राग संगणक किंवा लॅपटॉपवर काढला जातो. मात्र, नेमकी चूक कुठे होत आहे याचा विचार वापरकर्ता करीत नाही. जर तुम्हाला हे टाळायचे असेल तर वापरात नसलेले क्रोम ब्राउझर टॅब बंद करणे गरजेचे आहे. कामामुळे टॅब बंद करणे विसरून जात असाल तर एक्सटेंशनचा वापर करावा. चला तर जाणून घेऊया एक्सटेंशनबद्दल...

टॅब रेंगलर एक्सटेंशनचा करा वापर

गुगल क्रोम ब्राउजरमध्ये टॅब रेंगलर नावाचा एक्सटेंशन आहे. याला क्रोम ब्राउझरमध्ये जोडल्यानंतर जुने अनावश्यक टॅब स्वयंचलितपणे बंद होईल. जे टॅब तुम्ही बंद करू इच्छित नाही त्याला लॉक करू शकता. तसेच एक्सटेंशनच्या फंक्शनलासुद्धा बंद करू शकता.

क्रोम एक्सटेंशनला ब्राउझरमध्ये असे समाविष्ट करा

टॅब रॅंगलर एक्सटेंशन क्रोम ब्राउझरमध्ये समाविष्ट करण्यासाठी क्रोम वेबस्टोअरवर जा. त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला शोध घेण्याचा पर्याय दिसेल. त्यामध्ये क्रोम वेबस्टोअर टाइप करा. तसेच खाली दिलेल्या पर्यायात विस्ताराचा पर्याय निवडा. यानंतर टॅब रेंगलर नावाचा विस्तार दिसेल. त्यावर क्लिक करा आणि तो ब्राउझरमध्ये समाविष्ट केला जाईल. त्याचे चिन्ह यूआरएल बारच्या उजव्या बाजूला दिसेल. आवश्यक असताना स्वयंचलित वैशिष्ट्य बंद होण्यापासून देखील थांबवू शकते. या व्यतिरिक्त बंद टॅब पुन्हा उघडण्यासाठी या विस्ताराचे चिन्ह दाबल्यानंतर आपल्याला पुनर्संचयित करण्याचा पर्याय देखील मिळेल.

टॅब बंद करण्याची वेळ अशी करा सेट

टॅब रेंगलरचा वेळ सेट असतो. तुम्ही त्याला बदलवू शकता. वेळ बदलण्यासाठी ब्राउझरच्या यूआरएल बारशेजारील विस्तार चिन्हावर क्लिक करा. यानंतर नवीन प्रदर्शन उघडेल ज्यामध्ये वरच्या बाजूस पर्याय लिहिला जाईल. त्यावर क्लिक करा. येथून तुम्हाला २० मिनिटांचा वेळ दिसेल. येथून वेळ वाढवता येऊ शकते. क्रोम विस्तार डेटा कधीकधी आपल्या डेटामध्ये देखील प्रवेश करतो, म्हणून विस्तार स्थापित करण्यापूर्वी वर्णन काळजीपूर्वक वाचा.

(Is-your-laptop-slow?-New-features-introduced-by-Chrome-browser)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT