Chandrayaan 3 Update  eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 Update : आता काही तासच उरले! 'चांद्रयान-३' मोहिमेचा अंतिम टप्पा पूर्ण; प्रॉपल्शन आणि लँडर होणार वेगळे

ISRO Moon Mission : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ मोहीम अगदी यशस्वीपणे पुढे जात आहे.

Sudesh

Chandrayaan-3 : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ मोहीम अगदी यशस्वीपणे पुढे जात आहे. आज (16 ऑगस्ट) सकाळी साडे आठ वाजता चांद्रयानाने आणखी एक टप्पा पूर्ण केला. चांद्रयानाच्या चंद्राभोवतीचे ऑर्बिट मॅन्युव्हर पूर्ण झाले असून, लवकरच प्रॉपल्शन आणि लँडर हे एकमेकांपासून वेगळे होणार आहेत.

इस्रोने आज ट्विट करत याबाबत माहिती दिली. सध्या चांद्रयान हे चंद्राभोवती 153x163 एवढ्या कक्षेत फिरत असल्याचं इस्रोने सांगितलं आहे. आता पुढील टप्प्यामध्ये उद्या (17 ऑगस्ट) प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल हे एकमेकांपासून वेगळे होतील. याची वेळ अद्याप इस्रोने जाहीर केली नाही.

चांद्रयानामध्ये असणाऱ्या लँडरच्या आत रोव्हर फिट करण्यात आलं आहे. या दोन्हीला मिळून लँडर मॉड्यूल म्हटलं जातं. आता प्रॉपल्शन मॉड्यूल हे लँडर मॉड्यूलला चंद्रापासून 100 किलोमीटर उंचीवरील कक्षेत नेईल. त्यानंतर हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे होतील. (ISRO Chandrayaan 3)

यानंतर लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास करेल. साधारणपणे 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. 14 जुलै रोजी चांद्रयान-३ ने अवकाशात झेप घेतली होती.

दक्षिण ध्रुवावर उतरण्याची शर्यत

चांद्रयान-3 च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरणार आहे. अर्थात, रशियाचं लूना-25 हे यानदेखील सध्या चंद्राच्या दिशेने प्रवास करत आहे. हे यान 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर लँड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शर्यतीत रशिया बाजी मारू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT