ISRO Chief S Somanath about Sunita Williams esakal
विज्ञान-तंत्र

ISRO Chief : सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्याने जगाला चिंता, पण इस्रो प्रमुखांनी दिली खुशखबर; नेमकं काय म्हणाले?

Sunita Williams : इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विलमोर यांच्या परतण्याबाबतची चिंता दूर केली आहे.

Saisimran Ghashi

Sunita Williams : बोईंग स्टारलाईनर मधून अंतराळ स्थानकावर गेलेल्या अंतराळवीरांच्या परती बद्दल चिंताजनक बातम्या येत असताना आता इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विलमोर यांच्या परतण्याबाबतची चिंता दूर केली आहे.

त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे दीर्घकालीन मुक्कामासाठी सुरक्षित आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचा उशीर हा बोईंगच्या स्टारलाईनर क्रू मॉड्यूलच्या क्षमता चाचणीचा एक भाग आहे. सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर त्यांनी दिलासा दिला, कारण परतण्याच्या तारखेत अनेक तांत्रिक अडथळ्यांमुळे विलंब झाला आहे. त्यात जास्त काही धोका नाही. सोमनाथ यांनी सांगितले की, या अडथळ्यांवर मात करून, विल्यम्सने नव्या अंतराळ वाहन चाचणीसाठी पुढाकार घेतला आहे. तिच्या या साहसाचे त्यांनी कौतुक केले.

नासाच्या व्यावसायिक क्रू प्रोग्रामने स्टारलाईनर मिशनची मुदत ४५ ते ९० दिवसांपर्यंत वाढवण्याचा विचार केला आहे, ज्यामुळे आणखी तांत्रिक चाचण्या केल्या जातील. या प्रयत्नांद्वारे अंतराळ मोहिमांच्या क्षमतांमध्ये सुधारणा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर अंतराळवीरांची सुरक्षितता आणि कार्यक्षमता कायम ठेवली जाते.

अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विलमोर हे 5 जूनला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) येथे पोहोचले होते. त्यांची परती होण्याची तारीख जवळ येताच यानामध्ये हेलियम गळती होत असून तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर त्यांची परती दोनदा लांबणीवर पडली आहे. आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या अंतराळवीरांची पृथ्वीवर परत होईल असे सांगण्यात येत आहे.

दोन दिवसांपूर्वीच अवकाश स्थानकामध्ये एक उपग्रह तुटल्यामुळे या दोन्ही अंतराळवीरांना धोका निर्माण झाला होता. पण त्यातून ते सुखरूप बचावले. आता इस्रो प्रमुखांच्या या आशादायी विधानामुळे भारतीयांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT